Tuesday, October 8, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भिमा येथे सी एन जी पंपाचा वास येत असल्याने भीतीचे वातावरण

कोरेगाव भिमा येथे सी एन जी पंपाचा वास येत असल्याने भीतीचे वातावरण

कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील फरची ओढ्या शेजारील इंडियन ऑईल व सी एन जी पंप असून मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर येथून सी एन जी पंपातून मोठ्या प्रमाणावर वास येत असून पुणे नगर महामार्ग पर्यंत असाधारण दोनशे फुटांपर्यंत तीव्र वास येत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 कोरेगाव भिमा येथे युनिक पेट्रोलियम या नावाने पंप असून पुणे नगर महामार्गावरून प्रवास करणारे अनेक वाहन धारक येथे पेट्रोल, डिझेल व सी एन जी टाकण्यासाठी थांबत असतात पण मागील दोन दिवसांपासून येथील सी एन जी पंपातून गॅस चा तीव्र वास येत असल्याने शेजारील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 याबाबत संबधित संबधित सी एन जी पंप चालक  विकास खाजेकर यांच्याशी संपर्क साधला असून सी एन जी कंपनीशी संपर्क केला असून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली असल्याचे सांगितले.

शेजारी असणाऱ्या सी एन जी पंपातून मॅजिक दोन दिवसांपासून तीव्र वास येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून श्वास घ्यायला त्रास होत आहे. – किरण गव्हाणे,इंद्रायणी रसवंती गृह  

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!