Friday, July 12, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भिमा येथे श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह गुरुचरित्र...

कोरेगाव भिमा येथे श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह गुरुचरित्र पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न

गुरूचरित्र ग्रंथ वाचनासाठी १८५ सेवेकरी सोहळ्यात सहभागी – महिला व कोरेगाव भिमा येथे श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह गुरुचरित्र पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न सहभाग लक्षणीय

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर ) येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास बाल संस्कार सेवा केंद्र दिंडोरी प्रणित शाखा कोरेगाव भिमा ज्ञानराज नगर येथे श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह गुरुचरित्र पारायण सोहळा दिनांक १ डिसेंबर ते ८ डिसेंबर यादरम्यान मोठ्या उत्साहाच्या व भक्तिभवाच्या वातावरणात संपन्न झाला.

सलग आठ दिवस सुरू असणाऱ्या अखंड नाम जप यज्ञ सप्ताहात दररोज ८ वाजता नियमित भुपाळी आरती, व ८.३० वाजता सामुहिक श्री गुरूचरित्र ग्रंथ वाचन व १०:३० वाजता महानैवेद्य आरती व ११ वाजता सामुहिक दुपारी वाजेपर्यंत विविध प्रकारचे याग, सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत पव औदुंबर प्रदक्षिणा, साडेसहा वाजता नैवेद्य आरतीनंतर मार्गदर्शन व विष्णु सहस्त्रनामाचे सामुहिक वाचन सेवा घेतली गेली. सप्ताह शेवट दिवशी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आला होता.


या सप्ताह कार्यक्रम प्रसंगी गणेश याग , गिताई याग, चंडी याग व स्वामी याग तसेच गुरूचरित्र ग्रंथ वाचनासाठी १८५ सेवेकरी सोहळ्यात सहभागी झाले होते. लहान बालके व महिला भगिनींना सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या सप्ताहाची सांगता पालखीची ग्राम प्रदक्षिणा करण्यात येऊन महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घेतला.
या सप्ताह कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात नाम जप यज्ञ सप्ताह करण्यात येऊन गुरुचरित्र पारायण मोठ्या प्रमाणात करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास बाल संस्कार सेवा केंद्र दिंडोरी प्रणित शाखा कोरेगाव भिमा सर्व भाविकांनी व समस्त ग्रामस्थांनी सोहळा पार पाडण्यासाठी मोठे सेवाकार्य केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!