Thursday, February 22, 2024
Homeक्राइमकोरेगाव भिमा येथे दुचाकी चालकाच्या पोटावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने जागीच मृत्यू

कोरेगाव भिमा येथे दुचाकी चालकाच्या पोटावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने जागीच मृत्यू

कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) दिनांक ११ फेब्रुवारी रविवारी रात्री ८:३० वा.हॉटेल गणेश भुवन चौकामध्ये  पुणे नगर हायवे रोडवरील नगर बाजूकडे जाणारे लेनवर एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल ( एमएच १३ डी. एस. ५१०२) वरील रमन शरद काळे (वय २९) सध्या पेरणे फाटा ता.हवेली मूळ टेंभुर्णी ता.पंढरपूर जिल्हा सोलापूर  अंगात काळया रंगाचे जर्किंग, पायात निळया रंगाची जिन्स पॅन्ट हा रोडवर पडलेला दिसत होता. पुणे बाजूकडून नगर बाजूकडे जाणारे कोणत्यातरी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने पाठीमागून ठोस देवून अपघात केला संबधित जखमिस शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

स्वराज्य राष्ट्र
प्रातिनिधिक फोटो साभार इंटरनेट

याबाबतची पोलीस स्टेशन येथील तक्रारी नुसार मेलेल्या माहितीनुसार –  पुणे अहमदनगर हायवे रोडवर अहमदनगर बाजूकडे जाणारे लेनवर गणेश भुवन चौकात अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हयगयीने, अविचाराने, निष्काळजीपणे, रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात घालवून पुणे बाजूकडून नगर बाजूकडे जात असलेली हिरो कंपनीची स्पलेंडर प्लस मोटार सायकल नं एमएच १३ डी. एस. ५१०२ हिस पाठीमागून ठोस मारून अपघात करून अपघातात मोटार सायकलस्वार रमन शरद काळे (वय २९)वर्षे याचे किरकोळ व गंभीर दुखापतीस कारणीभूत होवून त्यांचे मृत्युस कारणीभूत झाला आहे. तसेच अज्ञात वाहनावरील अनोळखी चालकाने अपघात करुन अपघाताची खबर न देता व जखमीस उपचारास घेवून न जाता निघुन गेला असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खंडू चकित यांनी तक्रार दाखल केली आहे

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!