Thursday, July 25, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भिमा येथील फरशी ओढ्याजवळ बिबट्याने पळवला बोकड... 

कोरेगाव भिमा येथील फरशी ओढ्याजवळ बिबट्याने पळवला बोकड… 

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे फरशी ओढ्याजवळ पद्माकर देवराम ढेरंगे यांच्या गोठ्यावरील पूर्ण वाढ झालेल्या बोकडला दिनांक २४ जून रोजी सायंकाळी साडेसहा सातच्या सुमारास बिबट्याने झडप घालत उचलून नेत शिकार केल्याने कोरेगाव भिमा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    कोरेगाव भिमा येथील फरची ओढ्याजवळ पद्माकर देवराम ढेरंगे यांचा गायांचा गोठा असून येथे शेती कामासाठी एक महिन्यापूर्वी मराठवाड्यातील एक कुटुंब कामास आले असून चंद्रकला चाफेकानडे यांच्या मालकीचा  पूर्ण वाढ झालेला देशी बोकड बिबट्याने सायंकाळच्या सुमारास झडप घालत ओढुन नेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून तातडीने पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

 सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते हेमंत ढेरंगे यांनी  कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांना दिली यावेळी नागरिक यांनी शिरूर तालुक्याचे तालुका वनाधिकारी जगताप व वणपाल धातुंदे यांच्याशी समरक साधला. तसेच सरपंच संदीप  ढेरंगे यांनी  वनविभगाशी तातडीने संपर्क साधला असता वनपाल धातुंडे यांनी तातडीने सदर घटना स्थळास भेट देत पाहणी करत पंचनामा केला. 

   सदर घटना घडून गेल्यावर अर्ध्या तासाताच   वनविभागाचे कर्मचारी वनपाल धातुंडे आल्याने सरपंच व उपस्थित नागरिकांनी त्यांचे आभार मानले.

वनपाल धातुंडे यांनी सदर स्थळपाहनी करत पंचनामा केला असून याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

यावेळी कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे, उद्योजक हेमंत ढेरंगे, पद्माकर ढेरंगे, चंद्रकला चाफेकानडे व वनपाल धातुंडे उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!