कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक, शिक्रापूर परिसराची पाहणी
कोरेगाव भिमा – वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथे १ जानेवारीच्या जय स्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून कोरेगाव भीमा , वढू बुद्रुक, सणसवाडी व शिक्रापूर येथील पार्किंग तसेच कायदा व सुव्यवस्थेबाबत राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांच्याकडून पाहणी करण्यात आली.
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांच्याकडून कोरेगाव भिमा जय स्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थळ पाहणी करत कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेतली.१ जानेवारीच्या जय स्तंभ अभिवादन सोहळ्याची सर्व विभागांकडून जोरदार तयारी सुरू असून या सोहळ्यामध्ये सर्वात महत्त्वाची जबाबदारी पोलीस प्रशासन सांभाळत असते. कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक, शिक्रापूर, रांजणगाव येथील परिसरात राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांच्याकडून पाहणी करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्हा ग्रामीण. पोलीस अधीक्षक अधीक्षक अंकित गोयल ,शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवान, पोलीस निरीक्षक शिरूर संजय जगताप, वाहतूक पोलीस निरीक्षक जगताप, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलीस हवालदार सचिन मोरे, संदीप कारंडे वपोलीस पाटील मालन गव्हाणे उपस्थित होते.