Thursday, July 25, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी संदीप ढेरंगे यांची बहुमताने निवड

कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी संदीप ढेरंगे यांची बहुमताने निवड

संदीप ढेरंगे यांना १० मते तर केशव फडतरे यांना ७ मते

कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाचा विक्रम गव्हाणे यांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. यावेळी झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी  संदीप कचरू ढेरंगे यांची बहुमताने निवड झाली.

    शिरूर तालुक्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या  कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीच्या सरपंचपदाच्या  अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत ग्राम पंचायत सदस्य  सरपंच संदीप ढेरंगे यांना १० व ग्राम पंचायत सदस्य केशव फडतरे यांना ७ मते मिळाली. यावेळी संदीप ढेरंगे यांना बहुमत मिळाल्याने सरपंचपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास फुके यांनी सांगितले.यावेळी सरपंच विक्रम गव्हाणे व  ग्रामविकास अधिकारी रतन दवणे उपस्थित होते.

 या निवड प्रसंगी  माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ ( पि.के) गव्हाणे, अण्णासाहेब मगर बँकेचे संचालक राजाराम ढेरंगे, घोड गंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे, माजी अध्यक्ष पंडित ढेरंगे, माजी अध्यक्षा.  बबुशा ढेरंगे, ग्राम पंचायत सदस्य महेश ढेरंगे ,शरद ढेरंगे ,वंदना गव्हाणे, जयश्री गव्हाणे, रेखा ढेरंगे, कोमल खलसे, स्वराज्य राष्ट्र निर्माण सेनेचे राजेश सिंह ढेरंगे उपस्थित होते.

या निवडणुकीसाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, संदीप कारंडे, पोलीस पाटील मालन गव्हाणे उपस्थित होते.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ (पि. के )गव्हाणे यांनी सरपंच हे गावाचे झाले असल्याने सर्वसमावेशक व सर्व समाज घटकांना न्याय मिळेल असे काम करावे  तसेच गावातील सर्वसामान्य जनतेची कामे व्हायला हवीत ,विकासाला प्राधान्य देत गावाचा विकास करायला हवा असे मत व्यक्त केले.

कैलास सोनवणे यांनी गावाचा विकास हाच ध्यास या ध्येयातून कोरेगाव भीमाचे आदर्श विकासाचे मॉडेल तयार करायचे आहे.त्यासाठी सर्वांनी एकत्र येत काम करायला हवे असे मत व्यक्त केले.

२२ तारीख आणि २२ वे सरपंच – कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी संदिप ढेरंगे यांची निवड झाली.या एकी उपस्थित असणारे तानाजी ढेरंगे यांनी एक बाब सर्वांच्या उपस्थित लक्षात आणून दिली त्यांनी सरपंच पदी काम केलेल्या व त्यांचा कार्यकाळ असणाऱ्या नाम फलकाकडे सर्वांचे लक्ष वेधले आणि आज २२ तारीख आहे आणि सरपंच म्हणून अनुक्रमाने २२ वे सरपंच म्हणून संदिप ढेरंगे यांची निवड झाली असल्याचे सांगताच सर्वांनी फलक पाहत त्यांना हसत एकमेकांना टाळ्या देत दाद दिली.

कोरेगाव भिमा येथील पाणी योजनेचे तातडीने काम पूर्ण करण्यासह,गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे व भीमा नदीच्या पाण्याच्या शुध्दत्तेसाठी तसेच गावातील शेवटच्या घटकापर्यंत विकास कामे पोचण्यासाठी व त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. – नवनिर्वाचित सरपंच संदीप ढेरंगे

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!