Monday, June 17, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भिमा ग्रामस्थांनी अनुयायांचे स्वागत करणे ही कौतुकास्पद बाब - अंकित गोयल

कोरेगाव भिमा ग्रामस्थांनी अनुयायांचे स्वागत करणे ही कौतुकास्पद बाब – अंकित गोयल

कोरेगाव भिमा ग्रामस्थांना प्रशासनाकडून फक्त शब्दच…त्यावर कार्यवाही नाही – ग्रामस्थ

सी एस आर मधून हायमास्ट तात्काळ बसवून देण्याचे आश्वासन

कोरेगाव भीमा दि.२५  जय स्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर भीम अनुयायी येत असतात त्यामध्ये पुणे नगर बाजूकडून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी येत असल्याने  बार्टि संस्थेकडून अतिरिक्त निधी कसा मिळेल याचा विचार करताना सी एस आर मधून हायमास्ट दिवे तात्काळ बसवून देवू असे आश्वासन देत मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या अनुयायांचे स्वागत करण्यासाठी आपण पुढाकार घेत असता ही बाब कौतुकास्पद असल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगत २०१८ ची पुनरावृत्ती होवू द्यायची नाही ,ग्रामस्थांचे मागील वर्षी चांगले सहकार्य लाभले यावर्षीही ग्रामस्थांनी सहकार्य करा असे आवाहन यावेळी केले.(Koregaon Bhima)

       १ जानेवारी २०२४ विजय स्थंभ मानवंदना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भिमा येथे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी प्रांताधिकारी हरेश सूळ, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के , पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, सरपंच विक्रम गव्हाणे, माजी सरपंच नवनाथ माळी,  भानुदास सरडे, सत्यनारायण ढेरंगे, राजेंद्र गवदे, बन्सी फडतरे, दीक्षांत भालेराव,  सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, तलाठी, पोलिस पाटील मालन गव्हाणे,  नितीन ढोरे आदी उपस्थितीत होते. 

  कोरेगाव भिमाच्या समस्यांवर बोलताना तत्कालीन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी नदीला संरक्षक घाट, बहुउद्देशीय इमारत, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी बाबी पूर्ण करण्याचा शब्द दिला होता मात्र आजपर्यंत कोणतीही मदत प्रशासनाने कोरेगाव भीमा ग्रामस्थांना केली नाही याबाबत केशव फडतरे, राजेंद्र गवदे, संपत गव्हाणे यांनी खंत व्यक्त केली. (1janewari,Koregaon Bhima)

     तर पोलीस पाटील नितीन ढोरे यांनी  वाडागाव पुनर्वसन फाटा येथे हायमस्ट, सिसिस्टिव्ही बसवण्याची मागणी केली असून तेथे अपघातात अनेक जन्म आपला प्राण गमवावे लागले असून नागरिकांच्या जिवितासाठी प्रशासनाने तातडीने येथे हाय मास्ट दिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी केली असून याबाबत प्रशासनाने सकारात्मकता दाखवली आहे.

कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघातर्फे पोलीस अधिक्षकांचा सत्कार पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल हे कोरेगाव पभिमा येथे सामाजिक बैठकीला उपस्थित झाल्याबद्दल कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघातर्फे त्यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष दीक्षांत भालेराव,समितीचे शिरूर तालुका उपाध्यक्ष विश्वनाथ घोडके,हवेली तालुका अध्यक्ष अतुल गायकवाड,सदस्य राजू कांबळे,गौतम मोरे,राहुल वाघमारे,महेंद्र कांबळे,संजय गच्चे,विपुल घोडके,आप्पा कांबळे, आकाश माने,संघर्ष माने,आदित्य झडते,विनीत घोडके उपस्थित होते.

सामाजिक सलोखा व एकोपा राखावासमाज माध्यमांचा जपून वापर करावा.कोणीही समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट करू नये.सामाजिक एकोपा व सलोखा जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा.जर कोणी सामाजिक तेढ निर्माण करणारी पोस्ट केली तर त्याची खैर नाही संबधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा  प्रशासनाकडून देण्यात आला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!