Monday, June 17, 2024
Homeक्राइमकॉलेज परीसरात कोयत्याने दहशत करणाच्या आरोपीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या.....

कॉलेज परीसरात कोयत्याने दहशत करणाच्या आरोपीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या…..

पुणे -मु.सा. काकडे कॉलेज समोरील निरा बारामती रोडवर तेजस उर्फ दादु विजय सवाणे वय २२ वर्षे, रा. वाघळवाडी ता. बारामती हा हातात लोखंडी कोयता घेवुन मोठ मोठ्याने आरडाओरड करुन शालेय मुलांचे समोर दहशत निर्माण करत असल्याने त्यास पोलीसांनी ताब्यात घेत त्याच्याकडील लोखंडी कोयता हस्तगत करून वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक डि.एस. वारूळे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल , अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, पुणे ग्रामीण आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे , पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, सहा. पोलीस उपनिरीक्षक दिपक वारूळे, पोलीस हवालदार रमेश नागटीळक, अनिल खेडकर, अमोल भोसले, सागर देशमाने, अमोल भुजबळ, पोपट नाळे, पोलीस मित्र अजित नलवडे यांनी केली आहे.अवाहन -अशा प्रकारे कोयत्याने व इतर हत्याराचे सहय्याने दहशत माजविणाऱ्यांवर व सोशल मिडीयावर दहशत पसरवणाऱ्यांवर पुणे ग्रामीण पोलीसांकडुन कठोर कारवाई करण्यात येईल.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!