Wednesday, September 11, 2024
Homeकृषिकृषिमंत्री धनंजय मुंढे यांचा शेतकऱ्यांची खताबाबत फसवणूक होऊ नये म्हणून मोठा निर्णय...

कृषिमंत्री धनंजय मुंढे यांचा शेतकऱ्यांची खताबाबत फसवणूक होऊ नये म्हणून मोठा निर्णय…

विशिष्ट खतांची सक्ती करणाऱ्या व शेतकर्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी तक्रार करता यावी यासाठी तात्काळ व्हाट्सऍप (WhatsApp) क्रमांक सुरू करून दिला जाईल – कृषिमंत्री धनंजय मुंढे

पुणे –
महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या बाबतीतील प्रश्नांवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे तर सरकार मधील संबधित कृषी विभागाचे मंत्री धनंजय मुंढे हेही तीतक्याच तत्परतेने प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

 या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी बोगस बियाणं, खतं देणार्‍यांविरूद्ध आता कडक कारवाई केली जाईल. कायदेशीररित्या देखील त्यांच्यावर कारवाईचा कडक बडगा उचलला जाईल   On the very first day of this session, Devendra Fadnavis announced that strict action will be taken against those giving bogus seeds and fertilizers.  Legal action will also be taken against them असं सांगण्यात आल्यानंतर आज राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Mundhe) यांनी आता याबाबत शेतकर्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी तक्रार करता यावी यासाठी तात्काळ व्हाट्सऍप (WhatsApp) क्रमांक सुरू करून दिला जाईल असं सांगण्यात आले आहे.It has been said that a WhatsApp number will be started immediately so that farmers can complain to avoid cheating.

शेतकऱ्यांनी सदर व्हाट्सऍपच्या क्रमांकावर तक्रार केल्यास त्यांचे नाव गोपनीय ठेऊन भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात येईल. असेही सांगण्यात आले आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंढे (Dhananjay Mundhe)यांनी केलेले ट्विट –

खत विक्रेते शेतकऱ्यांना विशिष्ट खते विकत घेण्यासाठी सक्ती करून फसवणूक करत असतील तर शेतकऱ्यांना त्याची विभागाकडे तक्रार करता यावी यासाठी तात्काळ व्हाट्सऍप (Whatsapp) क्रमांक सुरू करून तो शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचे निर्देश आज झालेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. (1/2)

शेतकऱ्यांनी सदर व्हाट्सऍपच्या क्रमांकावर तक्रार केल्यास त्यांचे नाव गोपनीय ठेऊन भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात येईल. बियाण्यांच्या तक्रारींबाबत ओरिसा राज्याच्या धर्तीवर आपलेही समावेशक पोर्टल तयार करण्याचेही निर्देश दिले आहेत. (2/2)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!