Saturday, May 25, 2024
Homeशिक्षणकु. आदिती जाधवचे MHT-CET परिक्षेत ९९.४३ टक्के गुण प्राप्त करून नेत्रदीपक...

कु. आदिती जाधवचे MHT-CET परिक्षेत ९९.४३ टक्के गुण प्राप्त करून नेत्रदीपक यश

कुलदीप मोहिते कराड

कराड – यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडची विद्यार्थिनी कु. आदिती धनाजी जाधव हिने MHT-CET परिक्षेत ९९.४३ टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले. मु. पो. खोडशी ता कराड येथील ग्रामीण भागातील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कु. आदिती जाधव हिने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करत, अभ्यासात सातत्य ठेवून हे उज्ज्वल असे यश संपादन केले आहे.

घरातील आई वडील भाऊ यांचे तिला अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळाले. या उज्ज्वल यशाबद्दल यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य डॉ एस. बी. केंगार, महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच सह्याद्री साखर कारखाना, कराडचे माननीय संचालक पांडुरंग चव्हाण यांनी कु. अदिती जाधव हिचे कौतुक व सत्कार करून विशेष अभिनंदन केले. सर्वच स्तरातून कु. आदिती जाधव हिच्या या यशाबद्दल कौतुक व अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!