Saturday, May 25, 2024
Homeताज्या बातम्याकुणी कितीही पत्र पाठवली तरी सीमा वरती भागातील मराठी बांधवांसाठी आम्ही ६...

कुणी कितीही पत्र पाठवली तरी सीमा वरती भागातील मराठी बांधवांसाठी आम्ही ६ डिसेंबरला कर्नाटकात जाणारच”- मंत्री शंभूराज देसाई

हेमंत पाटील सातारा

दिनांक- ३ डिसेंबर

सातारा – कर्नाटकच्या सरकारनं १०० पत्र लिहीली तरी आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही मराठी भाषीक लोकांसाठी त्यांच म्हणनं ऎकुण घेण्यासाठी आम्ही ६ तारखेला बेळगावला जाणार आहोत. आम्ही ३ तारखेलाच जाणार होतो मात्र डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबरला असल्यामुळे अभिवादन कार्यक्रम असल्यामुळे त्याठिकाणी जाणार आहे.

हा देश लोकशाहीनं चालणार देश आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी याठिकाणी येवु नये असं कर्नाटकाच्या मुख्य सचिवानं किंवा मंत्र्यानं म्हणनं योग्य नाही असं विधान उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी केलं असून ६ डिसेंबरला सीमाभागात जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!