Friday, September 13, 2024
Homeताज्या बातम्याकानिफनाथ ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्थेच्या चेअरमनपदी उद्योजक नामदेव ढेरंगे यांची बिनविरोध निवड

कानिफनाथ ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्थेच्या चेअरमनपदी उद्योजक नामदेव ढेरंगे यांची बिनविरोध निवड

कोरेगाव भिमा – कोरिगा भिमा (ता.शिरूर) येथील कानिफनाथ ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्थेच्या चेअरमनपदी उद्योजक नामदेव ढेरंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

माजी चेअरमन शिवाजी बापूराव ढेरंगे यांनी सात वर्षांचा कालावधी यशस्वी पूर्ण झाल्यानंतर नव्याने २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी नामदेव ढेरंगे यांची बिनविरोध निवड झाली .यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व कानिफनाथ ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्थेचे संस्थापक विठ्ठल ढेरंगे, व्हॉईस चेअरमन शांताराम फडतरे, संजय फडतरे, प्रकाश ढेरंगे, कृष्णा ढेरंगे,मंजुळा ढेरंगे,संचालिका वृषाली ढेरंगे,संचालक शिवाजी राऊत,संचालक नामदेव वीटकर यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित चेअरमन नामदेव संभाजी ढेरंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या कार्यक्रम प्रसंगी महत्वाचे मार्गदर्शन संस्थापक विठ्ठल ढेरंगे, शिरूरचे सहाय्यक निबंधक साकोरे साहेब यांनी केले तर सूत्रसंचालन संपत गव्हाणे तर आभार नवनिर्वाचित चेअरमन नामदेव ढेरंगे यांनी मानले.

चेअरमनपदी नामदेव ढेरंगे यांची बिनविरोध झाल्याने माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, ग्राम पंचायत सदस्य केशव फडतरे,माजी चेअरमन शिवाजी बापूराव ढेरंगे,शिवाजी माधव ढेरंगे,शांताराम ढेरंगे,आप्पासाहेब ढेरंगे, संचालक अशोक गव्हाणे ,समीर इनामदार, माजी सरपंच बापूसाहेब गव्हाणे,माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, माजी उपसरपंच नितीन गव्हाणेसुनील सवाशे, यांच्यासह पंचक्रोशीतील विविध पदाधिकारी व मित्रपरिवाराने शुभेच्छांचा वर्षाव केला.

यावेळी स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे, हनुमंत पतसंस्थेच माजी चेअरमन रामदास ढेरंगे, संचालक दत्तात्रय गव्हाणे,माजी उपसरपंच संदीप गव्हाणे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सतीश गव्हाणे, उद्योजक दिगंभर दाभाडे उपस्थित होते.

उद्योजक व नवनिर्वाचित चेअरमन नामदेव ढेरंगे यांनी श्री सद्गुरू फर्निचर उद्योगातून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण फर्निचर सेवा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसमावेशक विचारांच्या मनमिळाऊ युवा नेतृत्वाची चेअरमनपदी निवड केल्याने सर्व मित्रपरिवार व नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!