Friday, June 21, 2024
Homeइतरकस्तुरी कॉलेजचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा प्रथमच १५ वर्षांनी मोठ्या उत्साहात संपन्न

कस्तुरी कॉलेजचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा प्रथमच १५ वर्षांनी मोठ्या उत्साहात संपन्न

माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित मान्यवर

कोरेगाव भीमा – दिनांक २९ मे शिक्रापूर ( ता.शिरूर) येथील कस्तुरी शिक्षण संस्था कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. तब्बल 15 वर्षांनंतर एकत्र आलेल्या या मित्रांनी स्नेहमेळाव्यात उपस्थिती लावली आणि महाविद्यालयीन जीवनाच्या आठवणी जागविल्या. आपल्याच मित्र-मैत्रिणी समक्ष या मित्रांनी आपले अंतरंग मांडून वातावरण कधी हळवे तर कधी स्मित हास्य करत अविस्मरणीय बनविले.

२००७ते २०२२ मध्ये कस्तुरी शिक्षण संस्था कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा २९ मे रोजी कस्तुरी शिक्षण संस्था कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिक्रापूर येथे मोठ्या उत्साच्या वातावरणात संपन्न झाला. प्रथमच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सन २००७ ते २०२२ या वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना मेळाव्यासाठी बोलावण्यात आले होते. पदवी शिक्षणानंतर तब्बल १५ वर्षांनी आपले सर्व जुने मित्र-मैत्रिणी एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या परिवाराची, व्यवसाय, नोकरीबाबत माहिती जाणून घेतली.या बॅचचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. विद्यार्थ्यानी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळेस काहींच्या डोळ्यात पाणी आले होते. या स्नेहमेळाव्यास सर्व माजी विद्यार्थ्यांचे कॉलेज मधील जून फोटो मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले. स्नेह मेळाव्यासाठी मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

विद्यालयाचे प्राचार्य कळमकर सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राध्यापक संतोष धुमाळ सर होते. तसेच कॉलेज चे संस्थापक पंडित पलांडे सर आणि अध्यक्ष जयश्री पलांडे मॅडम, उपाध्यक्ष प्रतीक पलांडे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल वारे आणि सीमा निकम यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन गोरक्ष घावटे, अमोल गवारे, सचिन भंडारे, अनिल मासळकर, अमोल वारे, तानाजी दरेकर, ज्ञानेश्वर चव्हाण, रोहण ढमढेरे, राहुल काटे, किरण लांडगे यांनी केले होते. मेळाव्यासाठी कस्तुरी कॉलेज च्या वतीनेही चांगले सहकार्य केले गेले. कॉलेज च्या वतीने प्रा. कळमकर सर, प्रा दिवटे सर, प्रा अंबादास सर, प्रा बैनाडे मॅडम, प्रा तिवारी मॅडम,प्रा जाधव सर, प्रा खैरे सर, प्रा माते सर, प्रा टुले मॅडम प्रा कोल्हे मॅडम यांनी मोलाची मदत केली. त्या समवेत बहुसंख्यमध्ये माजी विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!