Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रकला व वाणिज्य महाविद्यालय उंडाळे येथे संविधान दिन साजरा

कला व वाणिज्य महाविद्यालय उंडाळे येथे संविधान दिन साजरा


प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान म्हणजेच भारतीय संविधान -प्रा.ए.ए.पटेल

कुलदीप मोहिते कराड

प्रत्येक भारतीयाला अभिमान आणि स्वाभिमान वाटावा असे भारतीय संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीने निर्माण केलेले आहे. संविधानामुळेच या विविधतेने नटलेल्या भारतीय देशांमध्ये एकता, अखंडता निर्माण झाली आहे. असे गौरवोद्गार प्रा. ए. ए. पटेल यांनी काढले.
ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय उंडाळे येथे राष्ट्रीय सेवा योजना मार्फत आयोजित केलेल्या संविधान दिनानिमित्त संविधानाचे महत्त्व या विषयावर ते बोलत होते. महाविद्यालयामध्ये संविधान दिनानिमित्त उंडाळे गावातून संविधान रॅली काढण्यात आली. त्यानंतर संविधानाचे महत्त्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पी. बी. पाटील यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी संविधान सभेची निर्मितीबाबत दिली. प्रा. प्रदीप चोपडे यांनी संविधानाचे महत्त्व याविषयी विवेचन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रा. प्राचार्य डॉ.जाविद शेख यांनी विद्यार्थ्यांनी संविधानातील विविध तरतुदी आत्मसात करण्याविषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.नीलम शेटे तर आभार प्रा. भिसे यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व स्वयंसेवक आणि महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!