Thursday, June 20, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रकराड मध्ये सर्वपक्षीय व विविध संघटनांच्या माध्यमातून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात...

कराड मध्ये सर्वपक्षीय व विविध संघटनांच्या माध्यमातून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलन

हेमंत पाटील

कराड – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल सतत सुरू असलेल्या वक्तव्याबद्दल कराड शहरांमधील सर्व पक्षियांकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ,कर्मवीर भाऊराव पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे शहर पोलीस स्टेशनला जाऊन कराड शहर पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांना निवेदन देण्यात आले .

यावेळी समता पर्वचे अध्यक्ष आनंदराव लादे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाज सुतार ,भीम आर्मीचे जावेद नायकवडी, राष्ट्रीय काँग्रेसचे जाकीर पठाण , आर्मीचे संतोष थोरवडे ,मराठा सेवा संघाचे भूषण पाटील ,अनिल घराळे ,आरपीआयचे सतीश कांबळे, शिवसेनेचे शशीराज करपे व सर्व कराड मधील पक्ष संघटने चे व कराडकर बहुसंख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!