Tuesday, July 16, 2024
Homeस्थानिक वार्ताकराड मध्ये युवासेनेची स्वाक्षरी मोहिम -वेदांता प्रकल्पावरून शिंदे- फडणवीस सरकारचा निषेध

कराड मध्ये युवासेनेची स्वाक्षरी मोहिम -वेदांता प्रकल्पावरून शिंदे- फडणवीस सरकारचा निषेध

कराड – कराड शहर शिवसेना आणि युवासेना याच्याकडून वेदांता- फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे- फडणवीस यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यासाठी कराड बसस्थानकासमोरील चाैकात स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थी, नागरिक यांनीही सहभागी होत स्वाक्षरी करत राज्य सरकारचा निषेध केला.

कराड येथे स्वाक्षरी मोहिम शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद, दिलीप यादव, संजय चव्हाण, महिला जिल्हा संघटिका अनिता जाधव, महिला तालुका संघटिका शोभा लोहार, प्रेमलता माने, संदीप पाटील, युवासेना शहर अक्षय गवळी, ज्ञानदेव भोसले, दशरथ धोत्रे, संभाजी जगताप, बापू भिसे, प्रवीण लोहार, निलेश पारखे, रामचंद्र पवार, धवल जाधव यांनी राबविली.

महाराष्ट्रात ठाकरे सरकार असताना वेदांता प्रकल्प येणार होता. यासंबधी कंपनीही तयार होती. परंतु केवळ दोन महिन्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आले आणि राज्यातील मोठा प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे आम्ही सध्याच्या शिंदे- भाजप सरकारचा युवासेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यासाठी स्वाक्षरी मोहिम राबविली आहे. – अक्षय गवळी, युवासेना शहर

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!