Sunday, June 16, 2024
Homeव्यावसायकराडच्या श्री धनलक्ष्मी सहकारी पतसंस्थेची सेवक वर्ग मीटिंग उत्साहात संपन्न

कराडच्या श्री धनलक्ष्मी सहकारी पतसंस्थेची सेवक वर्ग मीटिंग उत्साहात संपन्न

हेमंत पाटील कराड

कराड – कराड येथील श्री धनलक्ष्मी सहकारी पतसंस्था येथे उत्साहाच्या वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक परंपरा असून स्वांतत्र्य संग्रामात साताऱ्यातील सुपुत्रांनी अतुलनीय योग दिले असून आपण त्याचे कायम ऋणी आहोत असे मत व्यक्त करण्यात आले.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सेवक वर्ग मीटिंग संपन्न झाली. यावेळी चेअरमन दिलीप चव्हाण व मानद सचिव मोहन न चव्हाण यांनी सेवक वर्गास मार्गदर्शन करत पुढील काळात संस्थेची प्रगती होण्यासाठी काम करत संस्थेचे होत जोपसवे अशा अपेक्षा व्यक्त केल्या.

या कार्यक्रमा साठी धनलक्ष्मी फाउंडेशन चे संस्थापक दिलीप चव्हाण, संचालक मोहन चव्हाण , व्हॉईस चेअरमन प्रकाश पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाची सांगता संस्थेचे व्यवस्थापक कुंदप साहेब यांनी केली.

श्री धनलक्ष्मी सहकारी पतसंस्थेने यशस्वी वाटचाल करत ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.संस्थेला २५ वर्षे पूर्ण होणार असून संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असणार आहे . यावेळी विविध योजना राबवून ग्राहक व संस्थेचे हित जोपासत संस्थेची सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे . – चेअरमन दिलीप चव्हाण ,धनलक्ष्मी सहकारी पतसंस्था,कराड

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!