Saturday, November 2, 2024
Homeताज्या बातम्याकंपनी असावी तर अशी... पगार वाढीनिमित्त कामगारांनी गुलालाची उधळण करत काढली मिरवणूक

कंपनी असावी तर अशी… पगार वाढीनिमित्त कामगारांनी गुलालाची उधळण करत काढली मिरवणूक

किंबर्ली क्लार्क इंडिया प्रा.लि व्यवस्थापन व कामगार नेत्यांचे मानले कामगारांनी आभार

कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील किंबर्ली क्लार्क इंडिया प्रा.लिमिटेड  या कंपनीमध्ये १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२६ ( ३ वर्षाचा )पगार वाढीचा करार यशस्वी झाल्याने कामगारांनी कंपनी व्यवस्थापन व कामगार युनियन यांचे आभार व्यक्त करत डी जेच्या आवाजात गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली व आपला आनंद साजरा केला.या एकी कामगारांनी कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

किंबर्ली क्लार्क इंडिया प्रा.लिमिटेड  या कंपनीमध्ये १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२६ ( ३ वर्षाचा )पगार वाढीचा ऐत्याहासीक असा करार करण्यात आला.यावेळी कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापन यांनी सकारात्मक विचार करत एकमेकांशी सुसंवाद साधला तसेच   कंपनी व्यवस्थापनाशी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुहास दरेकर, बाबासाहेब दरेकर व सहकाऱ्यांनी संवाद साधला यावेळी कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक संवाद साधला यावेळी कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांची अभूतपूर्व मनोमिलन व संवाद साधला गेल्याने कोणताही वादविवाद न होता कामगारांना समाधानकारक पगार वाढ मिळाली. 

कामगारांना मिळालेली पगार वाढ – १) ८ वा करार – डायरेक्ट २१०००/ , इनडायरेक्ट – २३३२४/. , २) ५ वा करार – डायरेक्ट – १७०००/  इनडायरेक्ट – १८८५३/,  ३) २ रा करार – डायरेक्ट – १५०००/.   इनडायरेक्ट – १६६१७/, ४) १ ला करार – डायरेक्ट – १३०००/   इनडायरेक्ट – १३९७१/      या व्यतिरिक्त जे कामगार बस वापरत नाही त्यासाठी ५०० रूपये वाढ करण्यात आली . मेडिक्लेम पॅालीसी सर्व कामगारांसाठी ८ लाख रूपये पुर्ण देण्याचे मान्य केले. तसेच ८ आणी ५ वा करार असणार्यासाठी टर्म इंनस्युरन्स च्या रक्कमेमध्ये कोणताही बदल केला नाही . २ रा करारासाठी टर्म इंनस्युरंन्स ५० लाख करण्यात आला आणी १ ला साठी ३५ लाख करण्यात आला.

सदर करार करते वेळी सप्लाय चैन डायरेक्टर इंडिया आणी साऊथ एशिया संजय कचरे , एच आर डायरेक्टर इंडिया राधिका तोमर , सिनियर एच आर ,बिझनेस पार्टनर सप्लाय चैन इंडिया सुरेश वर्पे, मिल मॅनेजर संदिप गर्ग,प्रॅाडाक्शन मॅनेजर तुषार पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच संघटनेच्या वतीने किंबर्ली कामगार संघटनेचे अध्यक्ष सुहास दरेकर,उपाध्यक्ष योगेश भुमकर,सेक्रेटरी सुभाष दरेकर, सहसेक्रेटरी तानाजी जाधव,खजिनदार मंगेश खोले,सदस्य बाबासाहेब दरेकर, बेंजामिन जोएल यांनी सामंजस्य पणे करार पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केला .

व्यवस्थापनाने अत्यंत मनमोकळेपणाने हा उत्कृष्ट व आदर्श करार करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल संघटनेच्या वतीने कंपनी व्यवस्थापनाचे तसेच करार चालू असते वेळी सर्व कामगार मित्रांनी हा करार शांततामय वातावरणांमध्ये पुर्ण होण्यासाठी जे मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल सर्व सहकारी मित्रांचे मनपुर्वक आभार आणी धन्यवाद – सुहास दरेकर अध्यक्ष किंबर्ली क्लार्क कामगार युनियन, सणसवाडी, (ता.शिरूर, पुणे).

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!