Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याऔद्योगिक नगरी सणसवाडी येथे श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात...

औद्योगिक नगरी सणसवाडी येथे श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा

गावातील मंदिरांना पुष्प सजावट, देखणी भव्य बैलगाडा शर्यती ,निकाली कुस्त्यांसह, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

कोरेगाव भीमा – दिनांक १५ एप्रिल
औद्योगिक नगरी सणसवाडी ( ता.शिरूर ) येथील श्री भैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त बैलगाडा व जंगी कुस्ती आखाडा या कार्यक्रामचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले .जागृत व गावपांढरीचे दैवत श्री भैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाचा यात्राउत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार असून श्री भैरवनाथ दैवताला सणसवाडी गावच्या ग्रामस्थांनी सुंदर नियोजन. व आयोजन करत बैलगाडा ,कुस्त्या यांना भरघोस रक्कमेची बक्षिसे असून जिल्ह्यातील नामांकित पहीलवानांच्या जंगी कुस्त्या होणार असून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


या उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धा आयोजित केल्या असून ४,३५,५५१ रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
प्रथम क्रमांक बक्षीस १ लक्ष ११ ,१११ रुपये , दुसरे बक्षीस ८८,८८८ रुपये , तिसरे बक्षीस ६६,६६६ रुपये , चतुर्थ बक्षीस ४४,४४४४ रुपये , आकर्षक फायनल साठी चांदीची गदा यासह विविध बक्षिसांची लयलूट करतायत आली आहे.

दिनांक ७ एप्रील ते ८ एप्रील रोजी श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे.यावेळी गावातील श्री भैरवनाथ महाराज मंदिर, श्री हनुमान व राम मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, खंडोबा महाराज मंदिर, काळूबाई मंदिर या मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.
भैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव घरोघरी मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात येत आहे तर मोठ्या प्रमाणावर पै – पाहुण्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.

उस्तवाचे आयोजन सणसवाडी येथील सर्व ग्रामस्थ, ग्राम पंचायत सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, स्नेहल राजेश भुजबळ, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, सागर दरेकर, रूपाली दरेकर, शशिकला सातपुते,
माजी उपसरपंच विजयराज दरेकर,सागर दरेकर, नवनाथ सोपान दरेकर ,रामदास दरेकर, दगडू दरेकर, नवनाथ रामभाऊ हरगुडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष वैभव यादव,माजी सरपंच रमेश सातपुते, माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर,उद्योजक राजेश भुजबळ,माजी संचालक दत्तात्रय पठाण हरगुडे, सावता संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ,गोरक्ष दरेकर , साठे गुरुजी,हिरामण दरेकर, बबन हरगुडे, , कैलास दरेकर, मोहन हरगुडे, दिंडी मंडळाचे आदिनाथ हरगुडे, रामदास दरेकर, काळूराम हरगुडे ,मोहन दरेकर ,सुरेश हरगुडे व समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले

कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असणार आहे .. शुक्रवार दिनांक ७ एप्रिल निमित्त सकाळी ६ ते ९ श्रींची महापूजा व अभिषेक , सायं . ३ ते ८ पालखी मिरवणुक सोहळा टाळ मुदुंग , ढोल – ताशा व हलगीच्या गजरात भव्यमिरवणुक व भावयदिव्य आतषबाजी. रात्री ९ नंतर ‘ पूजा सांस्कृतिक कला केंद्र ‘ यांचा सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार दि.८ बैलगाडा शर्यती ,निकाली कुस्त्यांचा जंगी आखाड्याचा कार्यक्रम व रात्री ९ नंतर जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र यांच्या वतीने शिफा पुणेकर प्रस्तुत ‘ नशा ‘ कार्यक्रम शुथम कंपनी शेजारी

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!