Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाऑलम्पिक विजेते मुरलीकांत पेठकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान.

ऑलम्पिक विजेते मुरलीकांत पेठकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान.

पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि प्यारा ओलंपिक गोल्ड मेडलिस्ट मुरलीधर पेठकर यांनी आयुक्तांचे केले कौतुक.

पुणे – महानगरपालिकेचे पाठबळ असले की काय घडू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे
पिंपळे गुरव येथील काळुराम जगताप जलतरण तलाव येथे समर स्विमिंग कोचिंगचा दि 16 जून 2023 रोजी संपन्न झालेला प्रमाणपत्र वितरण सोहळा.या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भारताचे पहिले प्यारा ओलंपिक विजेते व जागतिक विक्रमवीर,तसेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त मुरलीकांत पेठकर यांनी भूषवले.

पेठकर यांच्या हस्ते या सोहळ्यात दीडशे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाचे कौतुक केले ते म्हणाले पालिकेने जलतरण तलाव उपलब्ध केल्यामुळे समर स्विमिंग सारख्या प्रोफेशनल कोचेस ना एक खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो आणि त्यातूनच भविष्यातील चांगले जलतरणपटू तयार होऊ शकतील.

याप्रसंगी या क्लासच्या संचालिका विद्या कदम यांनी पण पेठकर म्हणल्याप्रमाणे याचे संपूर्ण श्रेय पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह तसेच जितेंद्र वाघ व क्रीडायुक्त मनोज लोणकर यांना दिले.
यावेळी एक्स स्विमिंग कोच पी. डी. पाटील यांचे बहुमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका घोडके यांनी केले आभार रवींद्र कांबळे यांनी मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!