दिव्यांग बांधवांच्या निधीबाबत खोटे बोलून दिशाभूल करणाऱ्या ग्रामसेवक रतन दवणे व ग्राम पंचायत कोरेगाव भिमा यांच्या कारभाराविषयी पुणे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येणार – धर्मेंद्र सातव
ग्रामसेवक रतन दवणे यांच्या खोटे बोलून दिशाभूल करणाऱ्या गलथान कारभाराचा निषेध म्हणून मनगटावर चुना लावून बोंबाबोंब आंदोलन
कोरेगाव भिमा- शिरूर तालुक्यातील दिव्यांगांनी ऐन दिवाळी सणामध्ये ग्राम पंचायत कोरेगाव भिमा (ता.शिरूर) समोर दिव्यांग निधि जमा करतो असे आश्वासन देत फसवणाऱ्या ग्रामसेवक रतन दवणे व ग्रामपंचायत कोरेगाव भिमा यांच्या गलथान व निर्दयी कारभारविरोधात मनगटावर चुना लावून बोंबाबोंब आंदोलन केले.
दिव्यांगांचे पैसे जमा करायचे नव्हते तर आमच्याशी खोटे कशाला बोलायचे ? आम्हाला महाराष्ट्र बँक व पि डी सि सी बँकेत चकरा का मारायला लावल्या ? असा उद्विग्न प्रश्न उपस्थित करत ग्रामसेवक रतन दवणे यांच्यामध्ये दिव्यांग बांधावाप्रती माणुसकी जिवंत आहे का ? असा प्रश्न निर्माण होत असून यावर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिरूर तालुक्याचे गट विकास अधिकारी डोके हे कार्यवाही करणार का ? असा प्रश्न निर्माण होत असून प्रहार दिव्यांग संघटना मात्र याबाबतीत आंदोलनावर ठाम असून ग्रामसेवक रतन दवणे यांच्यावर कार्यवाहीची मागणी करण्यात येत आहे.
दिवाळीच्या सणानिमित्त दिव्यांग निधी जमा झाल्यावर दिवाळीचा सण गोड करू अशी स्वप्ने पाहणाऱ्या दिव्यांग बांधवांची दिवाळी मात्र कोरडीच राहिली असून ग्रामसेवक रतन दवणे यांनी नुसतीच आश्वासने देत तुम्हाला दिवाळीत पैसे जमा करतो असे आश्वासन देत दिशाभूल केली इतक्यावरच ग्रामसेवक दवणे थांबले नाहीत तर त्यांनी दिव्यांगांना पि डी सी सी बँकेत चेक जमा केला आहे असे सांगताच मोठ्या आशेने दिव्यांग बांधव अगदी चालता येत नसतानाही सरपटत,कोणी काठीचा आधार घेत, एकमेकांचा आधार घेत बँकेत गेले असता त्यांना बँकेत पैसे जमा केले नसल्याचे सांगण्यात आले.यावेळी कुंडलिक वायकुळे यांनी बँकेचे स्टेटमेंट काढले त्यातही रक्कम जमा नव्हती झाली त्यामुळे सर्व दिव्यांग बांधवांच्या लक्षात आले की ग्रामसेवक आश्वासनं देत तोंडाला पाने पुसत असून दिव्यांगांच्या भावनांशी खेळण्याचा निर्दयी प्रयत्न करण्यात येत असल्याने ग्राम पंचायत कार्यालयासमोर दिव्यांग जमा होऊन ग्रामसेवक रतन दवणे व ग्राम पंचायतीचा निषेध म्हणून मनगटावर चुना लावून बोंबाबोंब आंदोलन केले.
कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना नुसती मिठाई दिली व शुक्रवार किंवा जास्तीत जास्त शनिवार पर्यंत खात्यात पैसे जमा होतील असे ग्रामसेवक रतन दवणे यांनी सांगितले यावर दिव्यांग बांधवांनी ग्रामसेवक दवणे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पण प्रत्यक्षात सोमवार आला तरी दवणे यांनी निधी जमा केला नाही .
यावेळी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन न घेता बंद करून ठेवला पण याबाबत गट विकास अधिकारी डोके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबधित प्रकरणात राठोड साहेबांना पाठवून चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या खात्यात शिल्लकच नसल्याचे सांगत असून कामगारांना पगार व बोनस दिल्याने शिल्लक नसल्याचे सांगितले पण जे कर्मचारी चोवीस तास काम करताt त्यांना दिवाळीला पगार आणि बोनस मिळायलाच हवा त्यांचा आणि आमच्या अपंग निधीचा संबंध काय ? असा दिव्यांग बांधव प्रश्न उपस्थित करत असून दिशाभूल आणि खोटे बोलण्याचे काम ग्रामसेवक रतन दवणे करत आहेत असे सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष कुंडलिक वायकुळे, माणिक सोनवणे ,गोरक्ष गेणा जाधव यांनी निषेध व्यक्त केला.
धर्मेंद्र सातव यांनी दिव्यांगांचा निधी वेळेत का वितरीत करत नाही . ग्राम पंचायत खात्यात शिल्लक नसताना खोटे बोलून बँकेत चेक जमा केला आहे हे खोटे बोलून दिव्यांगांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे काय ? मग अपंग निधी इतर ठिकाणी वापरला जात आहे काय ? जर वापरत असतील त्याचा अधिकार ग्राम पंचायतीला आहे का ? असे अनेक प्रश्न निर्माण होत असून मागील महिन्यात एकूण किती रक्कम जमा झाली व कोणाच्या खात्यावर किती रक्कम जमा केली याचा तपास जिल्हा परिषदेकडून करण्यात यावा तसेच संबधित ग्रमसेवक रतन दवणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.याबाबत वरिष्ठांशी संपर्क साधला गट विकास अधिकारी डोके यांनी संबधित प्रकरणी राठोड यांना चौकशी करण्याबाबत सांगितले असून संबधित प्रकरणाची सर्व माहिती घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.याबाबत राठोड यांनी संबधित प्रकरणी दिव्यांग बांधवांचा अर्ज प्राप्त झाल्यास चौकशी करण्यात येऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
या आंदोलनावेळी तालुकाध्यक्ष कुंडलिक वायकुळे, कोरेगाव भीमा प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष दशरथ गव्हाणे, माणिक सोनवणे, अशोक ढेरंगे, यश रमेश गव्हाणे, बलभीम मेटे ,संतोष ढेरंगे,वंदना संतोष शिर्तोडे, सोमनाथ परदेशी, गोरक्ष गेना जाधव,संतोष साहेबराव कांचन, परशुराम घावटे, ज्ञानेश्वर भांडवलकर व इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते.