Friday, May 24, 2024
Homeक्राइमएस टी बस मधून महिलेचा साडे सहा तोळ्याचा गंठण गेला चोरीला

एस टी बस मधून महिलेचा साडे सहा तोळ्याचा गंठण गेला चोरीला

कोरेगाव भीमा – शिक्रापूर( ता.शिरूर) येथे अहमदनगर ते शिक्रापूर प्रवास करताना एका चाळीस वर्षीय महिलेचा प्रवासादरम्यान साडे सहा तोळ्याचा गंठण चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

याबाबत संबधित मनिषा राजेंद्र गवारे (वय ४० वर्षे) रा.पुणे यांनी शिकापुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला मनीषा गवारे या मंदा कृष्णा पवार (वय३५ वर्ष) यांच्यासोबत अहमदनगर येथे प्रवासादरम्यान त्यांच्या जवळ ६ तोळा ५३० मीली ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण त्यांच्या पर्स मध्ये ठेवले होते.अहमदनगर शिरूर मार्गे शिकापुर येथे आले असता पाणी पिण्यासाठी बागमधील बॉटल येवून पाणी पिताना सोन्याचे दागीने ठेवलेली पर्सेची चैन उघडी दिसल्यामुळे पर्स मध्ये पाहीले असता मला त्यामध्ये असलेले ६ तोला ५३० मीली ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण दिसले नाही. म्हणून फिर्यादी महिला मनीषा गवारे यांनी शोधले असता सापडला नाही. गंठण चोरीला गेल्याचे लक्षात येताच फिर्यादी महिलेला चक्कर आली.

यावेळी त्यांच्या बहीणीने मला पाणी पाजले व पुण्याला मुलाकडे घेऊन गेल्या त्यानंतर मुलासह येऊन अज्ञातविरोधात फिर्याद दाखल केली असून सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!