Monday, June 17, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रएवढा संताप आलाय की तलवारीने एका एकाची मुंडकी छटावीशी वाटतात - माजी...

एवढा संताप आलाय की तलवारीने एका एकाची मुंडकी छटावीशी वाटतात – माजी खासदार उदयनराजे भोसले

हेमंत पाटील सातारा

दिनांक – २ डिसेंबर

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलतांना उदयन राजे म्हणाले असं वाटतंय तलवार घेऊन एक-एकाची मुंडकी छाटून टाकावी असं आक्रमकपणे म्हणत उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला आहे.

तुमच्या आई-वडिलांना कोणी बोललं तर तुम्ही सहन केलं असतं का ? शिवाजी महाराज नसते तर तुमचे आई-वडीलही नसते असे थेट सुनावत उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. सातारा येथे उदयनराजे यांनी हे विधान केले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्यावर सगळे शांत बसले असले तरी मी शांत बसू शकत नाही. मी एक शिवभक्त आहे आणि त्या घराण्यात माझा जन्म झाला आहे. त्यामुळे शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करू शकत नाही असे म्हणत उदयनराजे पुन्हा एकदा आज भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. सातारा येथे माध्यमांशी बोलत असतांना उदयनराजे यावेळी भडकल्याचे देखील पाहायला मिळाले.

माजी खासदार छञपती उदयनराजे भोसले यांनी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे जाण्यापूर्वी जलमंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून प्रवासाला सुरुवात केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे यांनी राज्यकर्त्यांवर नाव न घेता संताप व्यक्त केला . यावेळी परिसरात शेकडो शिवभक्त उदयनराजे यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते यातच उदयनराजे भोसले विद्यमान राज्यकर्ते व त्ताधार्‍यांवर नाव न घेता चांगलेच संतापलेले दिसून आले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!