Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्याएम पि एस सी परीक्षेत जातेगव खुर्द मधील कु. तेजस्विनी जयवंत घुले...

एम पि एस सी परीक्षेत जातेगव खुर्द मधील कु. तेजस्विनी जयवंत घुले यांची सहाय्यक अभियंता पदाला गवसणी

कोरेगाव भीमा – जतेगव खुर्द ( ता.शिरूर) येथील कुमारी तेजस्विनी जयवंत घुले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवत सहाय्यक अभियंता पदाला गवसणी घालत कुटुंबीयांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत जातेगाव ( ता.शिरूर) यांची नियुक्ती झाल्याने नागरिकांकडून तेजस्विनी घुले यांच्यासह कुटुंबियांवर मोठ्या प्रमाणावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उज्वला जयंतकुमार घुले यांची कन्या कु.तेजस्विनी जयंतकुमार घुले सत्कार करण्यात आला. १९९२ च्या दहावीच्या बॅच मधील वर्गमित्र व मैत्रिणी यांनी आई व मुलीचा सत्कार केला. यावेळी सुभाष दरेकर, संजय जगताप ,चंद्रशेखर खराबे, विजय गोगावले ,राजू शेवाळे ,शरद टिमगिरे बाजीराव दिघे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!