Tuesday, October 8, 2024
Homeक्राइमएमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार हत्या प्रकरणी मित्र राहुल हंडोरे याला अटक….

एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार हत्या प्रकरणी मित्र राहुल हंडोरे याला अटक….

पुण्यासह राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या दर्शना पवार हत्याकांड प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. दर्शना पवार ( Darshana Pawar) हत्या प्रकरणातील संशयित आरोपी राहुल हांडोरे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (MPSC)वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार ( Darshana Pawar) हिचा खुनाचा उलगडा करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश मिळाले असून तिच्या हत्येनंतर पाचव्या दिवशी या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

सुरुवातीपासून पोलिसांना ज्या व्यक्तीवर संशय होत, त्यानेच खून केला आहे. परंतु खून केल्याचे कारण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे. एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शन पवार हिच्या हत्याकांड प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली होती. पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपी राहुल हंडोरे याचा शोध घेत त्याला अटक केली. राहुल हंडोरे याला मुंबईत अटक करण्यात आली आहे.Rahul Handore the suspect in the Darshana Pawar murder case is finally in police custody

प्रकरण होते तरी काय
पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी १८ जून रोजी दर्शना पवार ( Darshana Pawar) हिचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. परंतु हा मृतदेह कुजलेला होता. त्यामुळे ओळख पटवणे अवघड झाले होते. दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार १५ जून रोजी तिच्या पालकांनी नोंदवली होती. पोलिसांना सुरुवातीपासून तिच्या घातपाताची शक्यता होती.

दर्शना पवार यांच्या हत्येमागील कारण –
दर्शना पवार ( Darshana Pawar) आणि राहुल हंडोरे (Rahul Handore) हे एकमेकांना फक्त ओळखतच नव्हते तर ते नातेवाईक आहेत. दोघांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली होती. परंतु एमपीएससीमध्ये यश राहुल ऐवजी दर्शनाला आधी मिळाले. दोघांना अधिकारी होऊ लग्न करायचे होते. राहुल याने दर्शनासोबत लग्न करण्याची आपली इच्छा होती. परंतु तो एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाला नाही, हीच मोठी लग्नासाठी अडचण ठरली.

दर्शनाच्या घरच्या मंडळींनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले होते. लग्नाची तयारीसुद्धा सुरु झाली. या लग्नामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने दर्शनाला अन् तिच्या कुटुंबियांना एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असा आग्रह धरला. तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल, असे तो सांगत होता. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे राहुलने दर्शनाला संपवण्याचा निर्णय घेतला.

सी सी टी व्ही फुटेज ठरले निर्णायक –
राहुल याने १२ जून रोजी दर्शनाला राजगडावर फिरण्यासाठी चलण्याचा आग्रह धरला. नातेवाईकच असल्याने दर्शना तयार झाली. मग दोघेही १२ जूनला राजगडावर गेले. सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी गडाच्या पायथ्याशी ते पोहचल्यावर दोघांनीही गड चढायला सुरुवात केली. गडावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये दोघे गड चढत असल्याचा प्रकार कैद झाला. मात्र त्यानंतर १०वाजता राहुल हंडोरे एकटाच परत आला. त्यावेळी दर्शना त्याच्या सोबत नव्हती. त्यामुळे पोलिसांना संशय आला. अन् त्या दिशेने तपास सुरु केला. त्याच्या शोधासाठी पाच पथके तयार केली अन् अखेर त्याला पकडण्यास पोलिसांना यश आले.Rahul Handore the suspect in the Darshana Pawar murder case is finally in police custody

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तीन राज्यात फिरून मुंबईत आलेल्या राहुल हांडोरेला पुणे पोलिसांना ठोकल्या बेड्या –
दर्शनाची पवारची ( Darshana Pawar) हत्या राहुल हंडोरेनेच केली हे पोलीस तपासाकत स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत आरोपी राहुल हंडोर पोलीसांना गुंगारा देत फरार होत होता. देशातील अनेक राज्यातून तो फिरत होता. मध्य प्रदेश, पश्चिुम बंगाल, हरियाणा इथे तो फिरत होता. पुणे ग्रामीण पोलीसांची पाच पथके त्याच्या मागावर होती. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आले आहे.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके आरोपीच्या मागावर होते. अखेर मुंबईमध्ये आरोपी राहुलला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलेले आहे. त्यानेच हे हत्या केल्याची आरोपीने कबुली दिली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!