मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण उपोषणाच्या पाठिंब्यासाठी कोरेगाव भिमातील मराठा बांधव एकवटले
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण उपोषणाच्या पाठिंब्यासाठी मराठा बांधवांकडून मशाल मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महिला भगिनी, युवक व ग्रामस्थांची संख्या लक्षणीय होती.
मराठा आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे.या उपोषणाला पाठिंबा व मराठा आरक्षण तातडीने मिळावे यासाठी कोरेगाव भिमा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छञपती संभाजी महाराज,एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण याविषयी घोषणा देण्यात आल्या.
या मशाल मोर्चा व साखळी उपोषणात सकल मराठा बांधव एकवटले आहेत.गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी, महिला भगिनी, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातीलमान्यवर उपस्थित होते.यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशन यांच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार,पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात , कॉन्स्टेबल मोरे,व इतर पोलीस बांधव यांनी कडक बंदोबस्त ठेवला.
कोरेगाव भीमा येथे साखळी उपोषण – मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण उपोषणाच्या पाठिंब्यासाठी कोरेगाव भीमा येथील वढू चौकामध्ये मंडप टाकण्यात आला असून येथे १ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊला मराठा बांधवांकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून यामध्ये मराठा बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.