Saturday, July 27, 2024
Homeस्थानिक वार्ताएक फोन आणि एक लाख दहा हजार माफ

एक फोन आणि एक लाख दहा हजार माफ

आमदार अशोक पवार यांनी मध्यप्रदेश येथून हॉस्पिटलशी संपर्क करत बिल केले कमी

कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर)

शिरूर-हवेलीचे आमदार अशोक बापू पवार हे काही कामानिमित्त मध्यप्रदेशात चार ते पाच दिवसांसाठी गेले होते. त्यावेळी मतदारसंघातील उरळगाव येथील हृदयविकाराने पीडित असलेले भानुदास बर्वे यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली.याबाबत नातेवाईकांनी आमदार अशोक पवार यांना संपर्क करत माहिती दिली. आमदारांनी देखील मध्यप्रदेशमध्ये असतानासुद्धा विनाविलंब रुबी प्रशासनासोबत संपर्क साधून पेशंटचे बिल कमी करून दिले.

तसेच वडगाव रासाई येथील बुवासाहेब गोविंदराव पवार यांना पॅरालिसीस अटॅक आल्यामुळे त्यांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. यांचेही 1 लाख 10 हजार रुपयांचे बिल आमदार अशोक पवार यांनी फोन द्वारे हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधत ते माफ करून दिले.

आमदार ॲड अशोक पवार यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने दर्जेदार विकास कामांचा डोंगर उभा केला असून नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या आमदाराच्या कार्यकर्तृत्वाचा पुन्हा एकदा नागरिकांना प्रत्यय आला यामुळे आमदार अशोक पवार यांच्या कामावर नागरिक समाधानी असतात. या संकट काळात मदतीला धावून आल्याबद्दल दोन्ही कुटुंबीयांनी आमदार अशोक पवार यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

त्यामुळे आमदार अशोक पवार कुठे असो त्यांचे लक्ष हे त्यांच्या मतदारसंघातील जनतेवर असते हे या दोन्ही प्रसंगातून पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे दिसून आले आहे

समाज माध्यमावर आमदार अशोक पवार यांच्या मदत कार्याबाबत मोठी चर्चा पाहायला मिळाली.अशोक पवार यांच्या कार्याला व मदतीबाबत नागरिकांनी आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

आमदार अशोक पवार यांचे हॉस्पिटलच्या बिलाबाबत अनेक कुटुंबांची मदत केली असून ते सतत जनतेच्या सुखासाठी काम करत असतात.आमदार अशोक पवार यांच्या कार्याला आमचा सलाम.
पंडित दरेकर , सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!