Monday, June 17, 2024
Homeस्थानिक वार्ताएकत्र खेळल्या, बागडल्या एकाच दिवशी दोन मैत्रीणींची आत्महत्या

एकत्र खेळल्या, बागडल्या एकाच दिवशी दोन मैत्रीणींची आत्महत्या

हवेली तालुका प्रतिनिधी सुनील थोरात

मांजरी बुद्रुक – शेवाळेवाडी ( ता.हवेली)

येथे दोन मैत्रीणींने आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय १९) व सानिका हरिश्चंद्र भागवत ( वय १९) अशी आत्महत्या केलेल्या तरूणींची नावे आहेत. आत्महत्येचे कारण समजलेले नाही. या दोन्ही तरुणींपैकी एकीने गळफास लावून तर दुसरीने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शेवाळेवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ अभिनंदन क्रिस्टल टॉवर या इमारतीमध्ये सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडना घडली. सानिकाने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अभिनंदन इमारतीमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आकांक्षाला हे समजल्यावर ती सानिकाच्या घरी गेली होती. या घटनेचा धक्का सहन न झाल्याने तीनेही याच इमारतीच्या टेरेसवरून सायंकाळी सातच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली.

स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार आकांक्षा व सानिका या दोघीही मैत्रिणी होत्या. सात वाजण्याच्या सुमारास सानिका हिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. रुग्णवाहिकेतून सानिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना आकांक्षाने पहिले. त्याच वेळी आकांशाने पाचव्या मजल्यावरून रुग्णवाहिके जवळ उडी मारली. त्यातच तिचा जागीच मृत्यू झाला. दोघींच्याही आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे करीत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!