Monday, June 17, 2024
Homeताज्या बातम्याएअर मार्शल विभास पांडे यांच्या हस्ते बीजेएस महाविद्यालयाच्या डॉ शिवाजी सोनवणे यांना...

एअर मार्शल विभास पांडे यांच्या हस्ते बीजेएस महाविद्यालयाच्या डॉ शिवाजी सोनवणे यांना लेफ्टनंट ऑफिसर रँक प्रदान

वाघोली – वाघोली ( ता.हवेली ) येथील भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विभाग प्रमुख व एनसीसी अधिकारी डॉ. शिवाजी मधुकर सोनवणे यांना एअर मार्शल विभास पांडे (AVSM,VSM AOC iC मॅनेजमेंट कमांड) यांच्या हस्ते नेव्हीतील सीनियर डिव्हिजन मध्ये त्यांना सब लेफ्टनंट ही ऑफिसर रँक प्रदान करण्यात आली. 

 डॉ. शिवाजी मधुकर सोनवणे यांनी राष्ट्रीय स्तरावरील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी कामठी जिल्हा नागपूर येथे ९० दिवसाचे राष्ट्रीय छात्र सेनेतील नेव्ही विंगचे प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणामध्ये देशभरातील विविध राज्यातील एनसीसी अधिकारी यामध्ये सहभागी झालेले होते. त्यांच्या या कामगिरीबद्दल महाविद्यालयातील संस्था पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!