Thursday, October 10, 2024
Homeक्राइमउसने दिलेल्या सहाशे रुपयांच्या वादातून तरुणाचा खून

उसने दिलेल्या सहाशे रुपयांच्या वादातून तरुणाचा खून

पोलिसांनी आरोपीला अवघ्या तीन दिवसात ठोकल्या बेड्या

पुणे – पनवेल रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणाचा ६०० रुपयांवरुन खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी तपास करुन आरोपीला तीन दिवसांमध्ये अटक केलं आहे.
पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेर एका २९ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं तरुणाची हत्या केल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
पनवेल रेल्वे स्थानकाच्या मालधक्का परिसरात २९ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. विकी गोपाल चंडालिया असे या मृत तरुणाचे नाव असून शहर पोलीस हत्येमागील कारणाचा तपास करत शोध घेत होते.
विकी हा मजूर होता. विकीचे कोणाशी वैर होते का ? याची चौकशी पोलिसांनी केली असता अखेर पोलिसांच्या हाती हा आरोपी लागला. मित्राला दिलेल्या सहाशे रुपयांवरून पनवेलमध्ये खून केल्याची कबुली पोलीस तपासात संशयित आरोपीने दिली.
या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी सचिन शिंदे याला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार उसणे दिलेले ६०० रुपये परत देण्यावरून वाद झाल्याने हा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

पनवेल शहरातील रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का या ठिकाणी २९ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. पनवेल रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का झोपडपट्टी जवळ विकी चंडालिया बिगारी काम करत होता. त्याची हत्या झाल्याची माहिती. पनवेल शहर पोलिसांना देण्यात आली.घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल होत त्यांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली होती. रात्री उशिरा संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून,पनवेल पोलीस अधिक तपास करत होते, उसण्या पैशांच्या वादावरून ही हत्या झाल्याचे समोर आले असून त्या वादातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!