परिसरात भीतीचे वातावरण
सुनील थोरात हवेली हवेली (उरुळी कांचन) – उरुळी कांचन परिसरातील पांढरस्थळ वस्ती येथे रविवारी (दि. २४) मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास दोन घरावर पाच चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली. यामध्ये एका घरातील ५० वर्षीय महिला जखमी झाली आहे.महिलेच्या कानातील दागिना काढण्यासाठी चोरट्यांनी महिलेचा कान तोडला. तसेच हातातील बांगडय़ा ही काढून घेतल्या परंतु बांगड्या सोन्याच्या नसल्याने घराबाहेर फेकून दिल्या आहेत.
महिलेच्या हातावर, तोंडावर चोरट्यांनी चाकूने वार केले. एक तोळा सोने केले लंपास तर त्याच परिसरातील दुसरे एक बंदिस्त घर फोडून घरातील साहित्याची तोडफोड करण्यात केली. याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत