Friday, July 12, 2024
Homeताज्या बातम्याउपसंचालक प्रसाद गायकवाड यांना ‘भ्रष्टाचार भूषण’ पुरस्कार देण्याची मुख्यमंत्र्यांकडे संभाजी ब्रिगेडची मागणी

उपसंचालक प्रसाद गायकवाड यांना ‘भ्रष्टाचार भूषण’ पुरस्कार देण्याची मुख्यमंत्र्यांकडे संभाजी ब्रिगेडची मागणी

२०१५ सालची लाचलुचपत केस चालू असताना प्रसाद गायकवाड यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पुन्हा पिंपरी महापालिकेच्या नगररचना विभागात नियुक्ती मिळतेच कशी? तसेच सदर अधिकारी  धनसंपदा कमावण्यासाठी आल्याचे व आगामी काळात आणखी दोन मोठे भ्रष्टाचार उघड करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांनी दिला आहे.

पुणे –  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कोट्यवधी रुपयांच्या  हस्तांतरित विकास हक्क (ॲम्युनिटी टीडीआर) घोटाळ्याबाबत संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री व पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे आयुक्त यांच्याकडे’भ्रष्टाचार भूषण’ पुरस्कार सुरू करण्यात  येऊन त्या पुरस्काराची सुरुवात पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगररचनाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांच्या पासून करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.

    पिंपरी चिंचवड महापालिकेचा वाकडमधील टीडीआर  घोटाळ्यामुळे महापालिकेचे तब्बल दीड हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊन महानगरपालिकेची राज्यात मोठ्या प्रमाणात बदनामी झाल्याचे व  भ्रष्टाचारामुळे नगररचनाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांचा मनमानी कारभार व कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत. सन २०१५ साली शेतकऱ्याच्या तक्रारीवरून प्रसाद गायकवाड यांना छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या नगररचना विभागात पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. सदर केस चालू असताना प्रसाद गायकवाड यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पुन्हा पिंपरी महापालिकेच्या नगररचना विभागात नियुक्ती मिळतेच कशी? यावरून ‘आंधळ दळतंय, कुत्र पीठ खातंय’ असा प्रकार दिसून येतोय. त्यामुळे येत्या काळात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारा सोबतच शासनाच्या वतीने ‘भ्रष्टाचार भूषण’ पुरस्कार देखील सुरू करण्यात यावा आणि त्या पुरस्काराची सुरुवात प्रसाद गायकवाड यांच्या पासून करण्यात यावी, अशी मागणी करत.

   लाचखोरीत रंगेहाथ पकडल्या गेलेल्या  संवेदनशील प्रकरणात आरोपी असणाऱ्या व्यक्तीला पिंपरी चिंचवड महापालिकेत नियुक्ती दिलीच कशी जाते? असा सवाल उपस्थित करत लाचखोरीच्या घटनेची गायकवाड यांच्याकडून वारंवार पुनरावृत्ती होत असेल तर हा अधिकारी महापालिकेत केवळ धनसंपदा कमाविण्याच्या हेतूने आल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण घटनांवरून आगामी काळातही त्यांच्या हातून अशाच प्रकारचे मोठे भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. नगररचना विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अनेक प्रकरणांमध्ये अनियमितता दिसून येत आहे. त्यांच्या नियुक्तीपासून ते आजपर्यंतच्या कालावधीमधील प्रकरणात त्यांनी पदाचा व अधिकाराचा सर्रासपणे गैरवापर केल्याचा व अजून दोन मोठे भ्रष्टाचार  येत्या काळात पुराव्यासहित उघड करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी पत्राद्वारे दिला आहे.

सतीश काळे यांच्या पत्राद्वारे प्रसाद गायकवाड यांची संपत्ती – शेतकऱ्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी प्रसाद गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्याला लाच प्रकरणी सन-२०१५ साली अटक केली होती. यावेळी प्रसाद गायकवाड यांच्या घरझडतीमध्ये एक लाख तेरा हजार रुपये रोख १९ तोळे सोने, पुणे येथे ३५ लाखांचा फ्लॅट व पुणे येथील एबीएच बँकेत लॉकर असल्याचे आढळले होते. आज ते प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!