Friday, July 12, 2024
Homeसाहित्य/सामाजिकअमृता फडणवीस यांचे वाघोली येथे उत्साहात स्वागत

अमृता फडणवीस यांचे वाघोली येथे उत्साहात स्वागत

सामाजिक क्षेत्रात मदत लागल्यास देण्याची तयारी – अमृता फडणवीस

वाघोलीतील भारतीय जैन संघटनेच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील अनाथ मुला - मुलींशी साधला संवाद

वाघोली – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे वाघोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भारतीय जनता पार्टी वाघोलीच्या वतीने उत्साहाच्या वातावरणात स्वागत व सत्कार करण्यात आला . यावेळी नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती

वाघोली ( ता . हवेली ) येथील भारतीय जैन संघटनेच्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील अनाथ मुला – मुलींशी थेट संवाद साधण्यासाठी अमृता फडणवीस शनिवारी ( दि . २० ऑगस्ट ) रोजी आल्या होत्या . विद्यार्थी व विद्यार्थीनिंशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत आनंददायी संवाद साधला.

वाघोली येथे भाजपा पदाधिकारी व केतन जाधव यांच्याशी संवाद साधताना अमृता फडणवीस

भारतीय जनता पार्टी वाघोलीच्या वतीने भाजप वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव व पदाधिकाऱ्यांनी वाघोलीनगरीमध्ये अमृता फडणवीस यांचे पुणे – नगर महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी अमृता फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली . तसेच पदाधिकाऱ्यांनी वाघोलीत केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली .

सामाजिक क्षेत्रात मदत लागल्यास देण्याची तयारी अमृता फडणवीस यांनी दर्शवली असल्याचे अध्यक्ष केतन जाधव यांनी सांगितले.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव , भाजप वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव , हवेली सरचिटणीस विजय जाचक , हरीश वाकुंज , स्नेहल कुलकर्णी , विद्या पाटील , शिवलेताई , शेखर पाटील , मनोज कांकरिया , आई प्रतिष्ठाणचे सदस्य , पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते .

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!