Thursday, July 18, 2024
Homeताज्या बातम्याउद्योगनगरी सणसवाडी ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी सुवर्णा रामदास दरेकर यांची बिनविरोध निवड

उद्योगनगरी सणसवाडी ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी सुवर्णा रामदास दरेकर यांची बिनविरोध निवड

सुवर्णा दरेकर यांची कारकीर्द सुवर्णाक्षरात कोरली जाईल – ॲड विजयराज दरेकर

कोरेगाव भीमा – दिनांक २० एप्रिल
उद्योगनगरी सणसवाडी (ता.शिरूर) ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी सुवर्णा रामदास दरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सुवर्णा दरेकर यांची कारकीर्द सुवर्णाक्षरात कोरली जाईल असा विश्वास ॲड विजयराज दरेकर यांनी व्यक्त केला.

फटाकड्यांची आतषबाजी, गुलाल भंडाऱ्याची मुक्त उधळण, फुलांचा वर्षाव, बँड, दोन ढोल ताशा पथके, क्रेनला लावलेला २१ फुटांचा भलामोठा सरपंच नाव असलेला आकर्षक फुलांचा हार, महिला भगिनिंची लक्षणीय उपस्थिती आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावरील गर्दी यामुळे सरपंच पदाचा हा सोहळा काही अगला वेगळा ठरला आहे.
ग्रामस्थांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी रस्त्यावर पाण्याच्या टँकरने पाणी मारण्यात आले होते तसेच पिण्याच्या थंड पाण्याची सुविधा करण्यात आली होती.


सरपंच संगीता नवनाथ हरगुडे यांनी ठरलेल्या वेळी राजीनामा देत एक आदर्श ठेवल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर यांनी आपल्या पदाचा ठरलेल्या वेळात राजीनामा देत एक आदर्श निर्माण केला तोच आदर्श माजी सरपंच स्नेहल राजेश भुजबळ व संगीता नवनाथ हरगुडे यांनी वेळेत अगदी एक महिना अगोदर राजीनामा देत आदर्शात मोलाची भर घातल्याने सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

 निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोरेगाव भीमाचे मंडल अधिकारी विकास फुके यांनी काम पाहिले त्यांना ग्रामसेवक बाळनाथ पवणे यांनी सहाय्य केले. भैरवनाथ मंदिरात मनोगत व्यक्त करताना रामदास दरेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करताना आनंदाश्रू अनावर झाले.
         यावेळी नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, माजी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, स्नेहल राजेश भुजबळ,माजी उपसरपंच ॲड विजयराज दरेकर,माजी उपसरपंच सागर दरेकर, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, शशिकला सातपुते,रूपाली दरेकर, ललिता दरेकर,दिपाली दरेकर,अक्षय कानडे,रामदास खुशाल दरेकर निवडणुकीसाठी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच ॲड विजयराज दरेकर यांनी तर आभार माजी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे यांनी मानले.

आत्तापर्यंत सरपंच व उपसरपंच पदावरील सर्वांनी एक महिना अगोदर राजीनामा देत असून सर्वांना वेळेत काम करण्याची संधी देत आहे. लवकरच आरोग्य केंद्राचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल तसेच गावच्या इतर समस्या सोडवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करू असे पॅनल प्रमुख युवराज दरेकर यांनी सांगितले.


यावेळी माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांनी सर्वांना सोबत घेऊन राजकारण करत विकासाचा समतोल राखण्यात येत असून गावातील वातावरण चांगले आहे. एक दोघेच उगाच गटा तटाचे राजकारण करत असून त्यांना यश मिळत नाही
असे मत व्यक्त केले.

पॅनल प्रमुख युवराज दरेकर, माजी उपसभापती आनंदराव हर गुडे, माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, माजी संचालक दत्तात्रय हरगूडे ,मनसेचे रामदास दरेकर,माजी चेअरमन सुहास दरेकर, बाबासाहेब दरेकर, अनिल दरेकर ,प्रशांत दरेकर, संभाजी साठे,वैभव यादव, गोरक्ष दरेकर ,गोरक्ष भुजबळ,सतीश दरेकर ,देवराम दरेकर,साहेबराव दरेकर व आजी माजी सरपंच, उपसरपंच , सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.


उद्योगनगरी सणसवाडी ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी सुवर्णा रामदास दरेकर यांची बिनविरोध निवड झाली असून ग्राम पंचायत निवडणुकीच्या वेळी काही वैद्यकीय अडचणींमुळे प्रचारासाठी एकाही मतदाराच्या घरी प्रचाराला गेल्या नव्हत्या पण त्यांचे पती रामदास दरेकर व कुटुंबीयांनी , दरेकर भावकी व पॅनल प्रमुख यांनी जपलेल्या ऋणानुबंध, सहकार्य व समाजकार्य यामुळे मतदारांनी भरघोस मते देत त्यांना विजयी केले होते.


सणसवाडी गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, कचरा प्रकल्प व महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न, युवकांना रोजगार यावर काम करणार असून सर्वसामान्य नागरिक ,मतदार , दरेकर कुटुंबीय, नातेवाईक पै पाहुणे यांच्या आशीर्वादाने काम करणार आहे.-
नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा रामदास दरेकर

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!