Friday, July 26, 2024
Homeइतरउड्डाण पुलाचे काम संथ गतीने,नागरिकांचे प्रचंड हाल, ठेकेदारावर कारवाई करा - राष्ट्रवादी...

उड्डाण पुलाचे काम संथ गतीने,नागरिकांचे प्रचंड हाल, ठेकेदारावर कारवाई करा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

उड्डाण पुलाचे काम न झाल्यास तीव्र आंदोलन

DGM रेणू शर्मा यांची ठेकेदारांना सुचना व रेल्वे अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश

रेल्वे बोर्डाच्या DGM रेणू शर्मा यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुरेश घुले, मध्य रेल्वे बोर्डचे सदस्य प्रविण शिंदे, जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा. दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादी पदवीधरचे अध्यक्ष निलेश घुले

हवेली : प्रतिनिधी सुनील थोरात   

   हवेलीमांजरी बुद्रुक ( ता.हवेली) वरुन हडपसर ला जाणाऱ्या उड्डाणपूलाचे चाललेले काम गतीने व्हावे यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुरेश घुले, मध्य रेल्वे बोर्डचे सदस्य प्रविण शिंदे, जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा. दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादी पदवीधरचे अध्यक्ष निलेश घुले यांनी रेल्वे बोर्डाच्या DGM रेणू शर्मा यांची भेट घेतली व त्वरित मांजरीच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाला गती देण्यात यावी व ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे सांगण्यात आले.         

  रेल्वे गेट बंद असल्या कारणाने लोकांची प्रचंड गैरसोय होत असुन सदर ठेकेदाराने उड्डाणपूलाचे काम अतिशय संत गतीने चालवलेले आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी दोन ते तीन वर्षे चाललेले काम लवकरात लवकर पुर्ण करा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल व रेल्वे गेट रहदारीसाठी खुले केलं जाईल असा इशारा त्या ठिकाणी दिला. सदर प्रसंगी DGM रेणु शर्मा यांनी सदर ठेकेदाराला त्वरित लवकरात लवकर काम करण्याच्या सूचना केल्या व रेल्वेच्या अधिकाऱ्यांस त्वरित पाहणी करून कामाचा अहवाल सादर करावा असे आदेश दिले.       

      सदर काम संथगतीने सुरू असुन रस्ता पूर्णपणे बंद असल्यामुळे छोट्या मोठ्या उद्योग व्यावसायिकाना शहरात नोकरी निमित्त जाणाऱ्यांना त्याचा खुप फटका बसत आहे तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जवळ जवळ ८ ते १० किलोमिटरचा वेढा घालुन हडपसरला जावे लागत आहे.फोटो

रेल्वे बोर्डाच्या DGM रेणू शर्मा यांच्याशी चर्चा करताना मान्यवर

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!