Thursday, October 10, 2024
Homeताज्या बातम्याआषाढी एकादशी व बकरी एकाच दिवशी आल्याने मुस्लिम बांधवांचा अनोखा निर्णय

आषाढी एकादशी व बकरी एकाच दिवशी आल्याने मुस्लिम बांधवांचा अनोखा निर्णय

हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांची मोलाची कामगिरी.आषाढी एकादशी व बकरी ईद एकच दिवशी आल्याने कुर्बानी न देण्याचा  शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील मुस्लिम बांधवांचा निर्णय

कोरेगाव भीमा – शिक्रापूर पोलीस स्टेशन ( ता.शिरूर) हद्दीतील मुसळ बांधवांची  शनिवार दि.२४ जून रोजी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व पोलीस बांधव यांच्या उपस्थितीत  बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधत एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करत सामाजिक सलोखा जपायला हवा असे आवाहन करताना मुस्लिम बांधवांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत बकरी ईद च्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेत तसे लेखी नवेदन दिले.
       या  बैठकीमध्ये मुस्लिम बांधवांनी बकरी ईद व  “देवशयनी आषाढी  एकादशी” एकाच दिवशी गुरुवार दिनांक २९ जून रोजी येत असल्याने व तो दिवस हिंदू धर्मामध्ये पवित्र असल्याने सदर दिवशी कुर्बानी देणार नसून शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मुस्लिम बांधव शुक्रवार दि.३०/०६/२०२३ रोजी कुर्बानी देणार असल्याचे  निवेदन दिलेले आहे.
       तरी, मुस्लिम बांधवांनी घेतलेला निर्णय हा स्तुत्य व सामाजिक बांधिलकी जपणारा असल्याने सदर त्यांच्यावर विविध स्तरातून. अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील मुस्लिम बांधव उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांची मोलाचे सहकार्य – “देवशयनी आषाढी  एकादशी” व  बकरी ईद एकाच दिवशी गुरुवार दिनांक २९ जून रोजी येत असल्याने व तो दिवस हिंदू धर्मामध्ये पवित्र असल्याने सदर बाबतीत मुस्लिम बांधवांनी  पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले यावेळी मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांच्या धार्मिक भावनांचा आदर राखत ईद च्या दिवशी कुर्बानी देणार नसून शुक्रवार दिनांक ३० जून ला कुरबंनी देणार असल्याचे निवेदन दिले पण यासाठी प्रबोधनाचे मोलाचे काम पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!