आर्मीचे वर्कशॉपचे २४ वेळा पुरस्कार मिळवत आदर्श रेकॉर्ड करत रचला इतिहास
सणसवाडी -चिंचोली मोराची (ता .शिरूर )येथील खडकी येथे आर्मी वर्कशाप मध्ये गेली ३० वर्ष कार्यरत असलेले आदर्श कामगार हभप किसन नाणेकर यांना २०२२ चा आर्मी बेस वर्कशॉप खडकीचा सर्वोत्कृष्ट कामगार म्हणून ‘ कमांडंट अँप्रीसिएशन ‘ हा पुरस्कार आर्मीचे कमांडंट यांचे हस्ते प्रदान करण्यात आला . आतापर्यंत त्यांना हा पुरस्कार २४ वेळा मिळाला असून आर्मीचे वर्कशॉपचे इतिहासातील एक रेकॉर्ड करत अगला वेगळा इतिहास रचला आहे. एक कष्टाळू मेहनती कुशल कामगार म्हणून त्यांची ओळख आहे.
याशिवाय धार्मिक अध्यात्मीक सामाजीक क्षेत्रात हभप किसन नाणेकर यांचे मोठे योगदान आहे . पंढरपुरला जाणाऱ्या निळोबाराय पालखीचे रथाचे काम ते स्वतः आवडीने करतात . १५ दिवस रजा टाकून ते प्रतिवर्षी चिंचोली मोराची येथील म्हाळसाकांत दिंडी सोहळ्यात जातीने सहभागी होऊन पायी चालत भजन नामघोषात सामील होत रात्री भजन गायनात प्रमुख भुमिका बजावतात . संपूर्ण कुटुंब धार्मिक असून चिंचोली मोराची परीसरात त्यांचे प्रामाणिक कामाचे कौतुक होत आहे . दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले .