Wednesday, July 24, 2024
Homeइतरआयुष्यात खेळातील पराभव आणि विजयाला कधी शेवटचा मानू नये - मारुती भूमकर

आयुष्यात खेळातील पराभव आणि विजयाला कधी शेवटचा मानू नये – मारुती भूमकर

राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेचे पुणे येथे आयोजन

पुणे – प्रत्येक खेळाडूने आयुष्यभर खेळाचा आनंद घेत, स्पर्धेला अथक प्रयत्न ,कष्ट,सातत्य व पूर्ण ताकदीने सामोरे जायला हवे.आयुष्यात खेळातील पराभव आणि विजयाला आपण कधी शेवटचा मानू नये ही क्रीडा भावना जीवनाचा एक भाग बनला पाहिजे. पराभव आणि विजय या एका नाण्याच्या दोन बाजू असून अविरत कष्ट, सातत्यपूर्ण प्रयत्न, विजयाचा ध्यास त्याग यामुळे आयुष्यात यशस्वी होता येते असे मत राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्रीरामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संस्थापक अध्यक्ष मारुती रामचंद्र भूमकर यांनी व्यक्त केले.

स्वराज्य राष्ट्र
पुणे – श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व आय ई डी एस एस ए यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडू व इतर मान्यवर

श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व आय ई डी एस एस ए यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेचे सणस मैदान येथे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन श्रीरामचंद्र कॉलेज इंजिनिअरिंग संस्थापक अध्यक्ष मारुती रामचंद्र भूमकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. सुषमा तायडे क्रीडा संचालिका यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की यशाची सुरुवात कृतीने होते म्हणजेच ज्या क्षणी तुम्ही सुरुवात केली त्या क्षणी यशाची सुरुवात झाली राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा हा मंच तुम्हा सगळ्यांसाठी स्पर्धेच्या प्रवेशद्वार ठरणार आहे. देशाची प्रगती आणि जगात त्याच्याबद्दलचा आदर याचा थेट संबंध हा क्रीडा क्षेत्राशी असतो देशात अनेक ठिकाणी क्रीडा विद्यापीठ उभारले जात आहे तसेच क्रीडा क्षेत्रासाठी अनेक आधुनिक साहित्य व क्रीडा मैदाने उभारली जात आहे या ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यातून म्हणजे १४ झोन मधून अनेक प्रथम क्रमांकाचे विजयी खेळाडू या ठिकाणी स्पर्धेसाठी उपस्थित राहिले .

यामध्ये राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंनी १०० , ४००, १५०० मीटर धावणे, रिले स्पर्धा ,हाय जंप, लॉंग जंप ,शॉर्टफुल डिस्कस थ्रो जावलींग थ्रो असे अनेक खेळांमध्ये भाग घेऊन विजय मिळवला आहे यासाठी पंच म्हणून नाना ताकवणे सर तसेच इतर पंचांनी या स्पर्धेचे कामकाज पाहिले या अथलेटिक स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सिंहगड इन्स्टिट्यूटच्या प्रीती डावरे, मयुरा पांडे ,अनिल जमदाडे , माळी सर , खेडेकर सर , गुणवरे सर व अनेक खेळाडू व प्रेक्षक उपस्थित होते

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!