Saturday, July 27, 2024
Homeशिक्षणआयुष्यात एक पुस्तक,एक पेन,एक विद्यार्थी, एक शिक्षक हे संपूर्ण जग बदलू शकतात...

आयुष्यात एक पुस्तक,एक पेन,एक विद्यार्थी, एक शिक्षक हे संपूर्ण जग बदलू शकतात – आमदार अशोक पवार

सणसवाडी येथील दोन जिल्हापरिषद शाळा व एक हायस्कूल शाळेतील १०० पेक्षा अधिक शिक्षकांचा सन्मान व सत्कार करण्यात आला

कोरेगाव भीमा – दिनांक ५ सप्टेंबर

सणसवाडी ( ता.शिरूर) येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार अशोक पवार यांनी आपल्या आयुष्यात एक पुस्तक,एक पेन,एक विद्यार्थी, एक शिक्षक, हे संपूर्ण जग बदलू शकतात. शिक्षक आई वडीलानंतर आयुष्याला आकार देणारे सर्वात पवित्र हात आहेत. शिक्षक म्हणजे ज्ञानाचा, पावित्र्याचा एक आदरणीय कोपरा असून अपूर्णाला पूर्ण करणारा, तत्त्वातुन जीवन मुल्ये फुलवणारा पूजनीय गुरुजन वर्ग आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,हायस्कूल शाळा गावठाण, वसेवडी, सणसवाडी ( ता.शिरूर) येथे आमदार अशोक पवार यांनी शिक्षक व गुरुजन यांच्याविषयी गौरोवोदगार काढत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत समाजाला विधायक दिशा देण्याचे व विविध क्षेत्रातील महान चरित्रे घडण्याचे काम करतात ,सध्याच्या स्पर्धेच्या युगातल्या तंत्रज्ञानाच्या आवाहनाला सामोरे जाताना माणुसकी,ज्ञान व संस्कार ,राष्ट्राभिमान असणारा विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सणसवाडी येथील जिल्हा परिषद शाळा वसेवाडी ,गावठाण व हायस्कूल शाळा येथे आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आपल्या भावी पिढीला घडवण्यासाठी अनमोल योगदान देणाऱ्या १०० च्या वर शिक्षकांचा भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

 यावेळी सणसवाडी येथील उपस्थित पदाधिकारी व नागरिकांनी  शिक्षकांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या शाळेतील संस्काराच्या आठवणी जागवल्या व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या आयुष्यात बदल होतो जीवनाला दर्जा प्राप्त होतो असे मत व्यक्त केले.
      आमदार अशोक पवार हे शिरूर हवेली तालुक्यात दर्जेदार विकास कामे करत असून त्यांच्या कार्यकाळात अनेक शाळांचे रूप पालटले आहे.शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहेत.त्यांच्या विकास कामाविषयी व नागरिकांच्या सुखसोयी साठी करण्यात आलेल्या प्रयत्नांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
      यावेळी पुणे जिल्हा नियोजनचे समितीचे सदस्य पंडित  दरेकर, सभापती मोनिका हरगुडे ,मार्केट कमिटी माजी संचालक दत्तात्रय हरगुडे उद्योगनगरी सणसवाडीच्या सरपंच संगीता नवनाथ हरगुडे , माजी उपसरपंच विजयराज दरेकर ,माजी उपसरपंच सागर दरेकर ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर,  समता परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ , माजी उपसरपंच नवनाथ विश्वनाथ हरगुडे , अक्षय कानडे, दगडू  दरेकर ,माजी सरपंच सुनंदा दरेकर, स्नेहल भुजबळ ,ग्रामपंचायत सदस्या रूपाली दरेकर, सुवर्णा दरेकर, शशिकला सातपुते ,ललिता दरेकर ,वंदना दरेकर,सुनिता दरेकर, वसेवाडी शाळेचे मुख्याध्यापक संतोष गोसावी ,जिल्हा परिषद सनसवाडी शाळेचे मुख्याध्यापक भंडारे, सणसवाडी  हायस्कूलचे ढुबे  सर  ,ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ दरेकर अनिल दरेकर , प्रशांत  दरेकर, सुभाष दरेकर, नवनाथ दरेकर उद्योजक रामदास दरेकर, नवनाथ हरगुडे, सागर हरगुडे, निलेश दरेकर अनिल गोटे सर ,बबन दरेकर ,बापूसाहेब  दरेकर, संतोष दरेकर व अन्य ग्रामस्थ मान्यवर व शिक्षक वर्ग उपस्थित होते
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!