Friday, July 26, 2024
Homeइतरआयएनएस वाघशीर स्कॉरपेन सबमरीन पाणबुडी देशाला अर्पण

आयएनएस वाघशीर स्कॉरपेन सबमरीन पाणबुडी देशाला अर्पण

मेक इन इंडिया अंतर्गत कराडचे नाव सातासमुद्रापार झळकले वातानुकुलीत यंत्रणा कराडच्या रेफ्रीजरेशनच्या आर. जी. शेंडे यांनी केली तयार

हेमंत पाटील सातारा

सातारा – कराड मेक इन इंडिया अंतर्गत ही उपलब्धता कराडसह देशवासीयांना अभिमानास्पद कामगिरी नुकतीच आयएनएस वाघशीर स्कॉरपेन सबमरीन पाणबुडी देशाला अर्पण करण्यात आली.

भारत सरकारने मेक इम इंडिया अंतर्गत पाणबुडी क्षेत्रात नव्याने आघाडी घेतांना आयएनएस वाघशीर स्कॉरपेन सबमरीन या पाणबुडीची संपूर्ण वातानुकूलन यंत्रणा कराड मधील रेफ्रिजरेशन यांचे कडून घेतली आहे. भारतीय नौदलात आयएनएस वागशीर ही पाणबुडी मुंबईत देशाचे रक्षा सचिव अजय कुमार यांच्या हस्ते सेवेत दाखल झाली. वागशीरमुळे नौदलाची ताकद वाढणार आहे. या पाणबुडीत वापरण्यात आलेली वातानुकुलीत यंत्रणा ही कराडच्या रेफ्रीजरेशनच्या आर. जी. शेंडे यांनी तयार केली आहे. त्यामुळे कराडचा नावलौकीक जागतिक पातळीवर पोहोचला आहे.भारतीय नौदलाच्या कडक नियम आणि दर्जा राखण्यासाठी कराडच्या कंपनीकडून योग्य पूर्तता झाली. एका फ्रेंच कंपनी व्यतिरिक्त आपल्या कराडमध्ये तयार झालेली स्वदेशी यंत्रणा देशाच्या सुरक्षा यंत्रणा मजबूत होण्यासाठी वापरली जाते. हे समस्त कराडकरसह देशवासीयांनसाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे संपूर्ण देश पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर कराडचे औद्योगिक योगदान बऱ्याच मोठ्या काळा नंतर पुढे आलेले आहे. रेफ्रिजरेशन चे आर. जी. शेंडे , त्यांच्या सुविद्य पत्नी राजश्री शेंडे आणि रेफ्रिजरेशनच्या संपूर्ण स्टाफचे सर्वत्र अभिनंदन होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

समुद्रात गस्त घालताना गुप्त हेरगिरीचे काम पाणबुडी करणार आहे.मेक इन इंडीया अंतर्गत ही पाणबुडी तयार करण्यात आली आहे. समुद्रात गस्त घालताना गुप्त हेरगिरीचे काम पाणबुडी करणार आहे. युध्दातही ही पाणबुडी महत्वाची ठरणार आहे. समुद्रात देखभाल करण्यासही ती सक्षम ठऱणार आहे. या पाणबुडीचे उद्‍घाटन रक्षा सचिव अजय कूमार यांच्या हस्ते झाले. माजगाव डाकयार्ड येथून ती समुद्रात सोडण्यात आली. सध्या समुद्रात या पाणबूडीची चाचणी घेण्यात येणार आहे. या पाणबुडीत कराडचे श्री रेफ्रीजरेशनचे आर. जी. शेंडे यांनी तयार केलेली वाताणुकुलीत यंत्रणा वापरण्यात आली आहे. शेंडे हे गेली दोन वर्षे यावर काम करीत होते.देश विदेशातून या पाणबूडीच्या एसीचे काम करण्यासाठीचे टेंडर मागवण्यात आली होती.त्यात कराडच्या रेफ्रीजरेशने बाजी मारली.

आम्ही आमच्या कंपनीत उच्च दर्जाचे उत्पादन करतो. यामुळे नौदलाच्या कडक चाचण्यात यशस्वी झालो. स्थानिक मनुष्यबळाच्या जोरावर आम्ही देशाच्या संरक्षण यंत्रणेला हातभार लावु शकलो अशीप्रतिक्रिया श्री रेफ्रीजरेशन कंपनीच्या संचालिका राजेश्री शेंडे यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!