रस्त्याचे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मशीनचा वापर
कोरेगाव भीमा – वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाकडे जाणाऱ्या कोरेगाव भीमा ते वढू रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्याची पाहणी आमदार अशोक पवार यांनी रात्री पाहणी केली असून काम श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समधिस्थळाला जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता असल्याने हा रस्ता दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण राहण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सिमेंट रस्ता बनवणारी मशीन श्री क्षेत्र वढू बुद्रुक रस्त्यासाठी वापरली गेली असून आधुनिक तंत्रज्ञान व दर्जेदार व गुणवत्तापूर्ण विकास यांची सुरेख संगम आमदार अशोक पवार, बांधकाम विभाग ,संबधित कंत्राट कंपनी यांच्या माध्यमातून झाल्याचे पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे साकारण्यात येणारे स्मारक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे, भव्य दिव्य असले पाहिजे यासाठी आमदार अशोक पवार जागरूकतेने लक्ष ठेऊन आहेत कोरेगाव भिमा ते वढू बुद्रुक रस्त्यासाठी कोट्यावधींचा निधी देण्यात आला असून या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. गुणवत्ता व दर्जेदार विकास कामांसाठी आग्रही असणाऱ्या आमदार अशोक पवार यांची कार्यतत्परता पुन्हा एकदा नागरिकांना अनुभवयास मिळाली असून रात्री साडे आकरा वाजता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मशीन पुणे जिल्ह्यातील विकास कामांसाठी पहिल्यांदा वापरण्यात येणार होती त्यावेळी आमदार अशोक पवार स्वतः उपस्थित राहून संबधित रस्त्याचे काम पाहत सूचना केल्या यामुळे विकास कामांसाठी आग्रही असणाऱ्या आमदार अशोक पवार यांच्या कार्यतत्परतेचा व जागरूकतेचा अनुभव ग्रामस्थांना आला.
यावेळी आमदार अशोक पवार , पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर,माहेर संस्थेच्या संस्थापिका ल्युसी कुरियन, माजी सरपंच अनिल शिवले, पांडुरंग आरगडे ,शेतकरी सागर आरगडे, बाळासाहेब आरगडे,रामदास भंडारे व वढू बुद्रुक ग्रामस्थ उपस्थित होते.