Wednesday, September 11, 2024
Homeइतरआमदार शशिकांत शिंदे चा जावली येथे आज जनता दरबार; सातारा जावली चे...

आमदार शशिकांत शिंदे चा जावली येथे आज जनता दरबार; सातारा जावली चे पुन्हा एकदा राजकारण तापले.

तब्बल १३ वर्षांनी भरवला गेला जनता दरबार

सातारा प्रतिनिधी – प्रतीक मिसाळ

जावली – दिनांक ७ फेब्रुवारी

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकी नंतर आमदार शिंदे पुन्हा एकदा जोरदार ॲक्शन मोडवर आले असून जावलीत त्यांनी आज जनता दरबार भरवून आमदार शिवेंद्र राजे भोसले यांना एकप्रकारे डिवचले आहे.जावली तालुक्यातील जनतेचे विविध प्रश्न व अडीअडचणी सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले जाते . आमदार शशिकांत शिंदे याच्या उपस्थितीत तब्बल १३ वर्षांनी जावली पंचायत समितीमध्ये आज दुपारी १ वाजता जनता दरबार भरवण्यात आला आहे , अशी माहिती जावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या वतीने देण्यात आली .

     आमदार शशिकांत शिंदे हे जावलीचे आमदार होते तेव्हा महिन्यातून एकदा जावली पंचायत समितीमध्ये जनता दरबार भरवत तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेत विकास कामाबाबत चर्चा केली जाई व सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींचे निवारण केले जात होते. मात्र , आमदार. शिंदे यांचे कोरेगाव तालुक्यात राजकीय पुनर्वसन झाल्यामुळे यात खंड पडला होता .
  मात्र,आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी जावलीवर लक्ष केंद्रीत केले आहे.विविध विकास कामासाठीही ते पाठपुरावा करत आहेत.त्यामुळे तब्बल १३ वर्षांनंतर जावलीत दुपारी १ वाजता जनता दरबार घेण्यात आला आहे . यावेळी जावली तालुक्यातील पदाधिकारी , कार्यकर्ते तसेच विकास कामांरोबर ग्रामस्थांच्या समस्या , शंकांचेही निरसन करण्यात येणार आहे .
     जनता दरबार च्या निमित्ताने आमदार शशिकांत शिंदे जावलीवर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. यात ते किती यशस्वी होतात  ते येणारा काळ ठरवेल परंतु आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची डोकेदुखी या जनता दरबाराने नक्की वाढणार हे मात्र निश्चित.

या दौऱ्यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार , जि.प. माजी शिक्षण सभापती अमित कदम तसेच जावलीच्या सभापती जयश्री गिरी व , तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत .

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!