सातारा जिल्ह्यातील मल्हारपेठ येथील आदित्य ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी
हेमंत पाटील साता
सातारा –सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटण मतदारसंघात आज आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले माजी मंत्री शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांना ललकारले यावेळी शंभूराजे देसाई यांना पर्यायी उमेदवार म्हणून शिवसेना जिल्हाध्यक्ष हर्षल कदम यांना उपस्थित शिवसैनिकांनी आपला नेता म्हणून आदित्य ठाकरे यांच्या समोर स्वीकारले तर शंभूराज देसाई यांना प्रतिस्पर्धी म्हणून निवडले यावेळी गद्दार आमदार म्हणून शंभूराज देसाई यांचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली.शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आलेल्या तमाम शिवसैनिकांनी जोरदार प्रतिसाद देत हात उंचावून आमदार गेले तरी काय झालं आम्ही तुमच्या बरोबर आहोत असा असे सांगत आदित्य ठाकरे यांना साद घातली.
सातारा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचा प्रवेश होताच जागोजागी आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी तमाम जिल्ह्यातील शिवसैनिक स्वागतासाठी सज्ज होते शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात शंभूराज देसाई यांच्या विरोधातला जनक्षोभ आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये दिसून आला आगामी काळातील येणाऱ्या निवडणुकीमध्ये याच विभागातील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल कदम यांना विरोधातला पर्यायी उमेदवार म्हणून तमाम शिवसैनिकांनी हर्षल कदम यांना एक मुखी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पाठिंबा दिला.
शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांच्या बालेकिल्ल्यात प्रथमच शंभूराज देसाई यांच्या विरोधात शिवसैनिक मोठ्या संख्येने आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये एकवटलेले दिसून आले. पाटण तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागातून हजारोंच्या संख्येत शिवसैनिक तोबा गर्दीमध्ये दिसून आली. यावेळी गद्दार हे गद्दार है अशा घोषणा देत मतदारसंघातल्या आमदारांनी केलेल्या गद्दारीला उत्तर उपस्थित शिवसैनिकांनी दिले . यापूर्वी पाटणमध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची अशीच सभा झाली होती त्या तोडीस त्यापेक्षा अधिक मोठ्या संख्येने शिवसैनिक या शिवसेना निष्ठा यात्रेच्या या कोणतेही नियोजन नसताना हजारोंच्या संख्येत उपस्थिती आगामी काळाच्या राजकारणात शंभूराज देसाई यांना धोक्याची घंटा या निमित्ताने दिसून आली