ज्येष्ठ महिलांनी आमदार रोहित पवार जेवले नाहीत म्हणून १८ किलोमीटरवर येऊन खाऊ घातली मास वडी
पुणे – उरळगाव (ता.शिरूर) येथे युवा संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अठरा किलोमिटर पायी चालताना अन्नाचा कणही न घेता मराठा उपोषण केले होते ते उपोषण सुरू असताना आपल्या गावात आमदार रोहित पवार अन्नाचा एक कणही न खाता उपाशी पायी गेले त्यामुळे टाकळी भीमा येथील ६० वर्षीय रतन रोहिदास वडघुले या ज्येष्ठ मातेच्या मनाला वाईट वाटले यामुळे त्यांनी आमदार रोहित पवार यांचा उरळगाव येथे मुक्काम असताना थेट १८ किलोमिटर प्रवास करत आग्रहाने मास वडीचे दोन घास खाऊ घालत आमदार रोहित पवार यांचे उपोषण सोडले.यावेळी ६३ वर्षीय द्वरकाबाई शिवाजी सावंत या उरळगाव येथील मातेनेही रोहित पवार यांना भरवले तर एका सहा वर्षीय चिमुकली मृणाल शिवाजी सत्रस हिच्या हस्ते खत व तिलाही आपल्या हाताने भरवले.
यावेळी आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित आबा पाटील व इतर उपस्थित युवा ,नागरिक व कार्यकर्त्यांच्या आग्रहाने आमदार रोहित पाटील यांनी उपोषण सोडले.
टाकळी भीमा येथील महिलांनी युवा संघर्ष यात्रा येणार म्हणून पहाटेपासून स्वयंपाक केला तेंव्हा सकाळी साडे दहाला सर्वांनी जेवण केले पण आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार रोहित पवार कृतीयुक्त पाठिंबा दिला यावेळी जेवण न करता ते अठरा किलोमीटर पायी चालले याची रुखरुख वृद्ध मातांना लागल्याने त्यांनी संध्याकाळी थेट उरळ गाव येथे येऊन आग्रहाने आमदार रोहित पवार यांना मास वड्या खाऊ घातल्या.