Thursday, July 25, 2024
Homeताज्या बातम्याआमदार महेश लांडगे यांच्या 'गाव चलो' अभियानास सणसवाडी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार महेश लांडगे यांच्या ‘गाव चलो’ अभियानास सणसवाडी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याने नागरिकांनी व्यक्त केला आनंद 

कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथे भाजपा पक्षाच्या वतीने गाव चलो अभियान राबवण्यात येत असून आमदार महेश लांडगे व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधत केंद्र व राज्याच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली.यावेळी सणसवाडी ग्रामस्थांचा गाव चलो अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

   यावेळी पीक पाहणी नोंदीसाठी सुलभता यावी,धानोरे- डिंग्राजवाडी  बनवलेल्या पोट चाऱ्या खुल्या करणायाठी प्रयत्न करण्यात येईल तसेच भूमी अभिलेख ग्राम पंचायत मागील रस्ता मोजण्याचे आश्वासन तसेच पाझर तलाव भिंत मोजणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. समस्येचे तातडीने निराकरण व नागरिकांचे शंका निरसन लगेच होत असल्याने नागरिकांनी या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी एका अधिकाऱ्याच्या बोलण्यातून उस्मानाबाद असे नाव आल्यावर प्रदीप कंद यांनी त्यांना धाराशिव म्हणा आपण शासकीय अधिकारी असून शासनाच्या आदेशाने बदललेल्या नावांचा विसर पडू नये असे म्हणताच  उपस्थितांनी दाद दिली.

शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के,कोरेगाव भीमा मंडळ अधिकारी विकास फुले, सणसवाडी तलाठी घोडके, पाट बंधारे विभागाचे अधिकारी, एम एस सी बी चे अधिकारी , सरपंच रुपाली दगडू दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर,माजी उपसरपंच  ॲड.विजयराज दरेकर, ग्राम पंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी बळनाथ पवणे उपस्थित होते.

प्रदीप कंद यांनी दत्तक घेतल्या सुकन्या – सणसवाडी येथील विद्यार्थिनींना सुकन्या योजनेबद्दल माहिती देत  सुकन्या योजनेतील सर्व मुलींना सुकन्या योजना राबविण्यात येऊन त्याची फी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद भरणार असल्याचे सांगितले.

      महिला बचत गटाच्या महिलांना संजय गांधी निराधार योजना, सुकन्या योजना व इतर योजनांची माहिती आबासाहेब सोनवणे यांनी दिली यावेळी आमदार महेश लांडगे व  प्रदीप कंद यांनी महिला भगिनिंच्या समस्या व अडचणी समजून घेत तहसीलदार यांच्याशी चर्चा करून महिलांच्या साठी एक दिवसीय कँप लावून सरकारी योजनांची अंमलबजावणी करू तसेच रोजगार निर्मिती व महिला स्वावलंबन यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावी राबवण्यासाठी प्रयत्न करू व महिला स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगताच महिलांनी उत्स्फूर्त स्वागत केले.  यावेळी महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा मीनाक्षी हरगुडे, सिमाई फाऊंडेशनच्या सीमा पवार,सुरेखा दरेकर, प्रतीक्षा हरगुडे, शुभांगी हरगुडे,मनीषा दरेकर,सुनीता दरेकर, भाग्यश्री गायकवाड, सुमन दरेकर व इतर महिला भगिनी उपस्थित होत्या.

असा होता गाव चलो कार्यक्रम – सकाळी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचे  दर्शन घेऊन गाव चलो अभियानाला उत्स्फूर्त सुरुवात करण्यात आली. विविध विकास सहकारी सोसायटी, प्रभू श्री राम यांची आरती तसेच श्री राम प्राणप्रतिष्टापणे वेळी घरोघरी अक्षता वाटप केलेल्या सहकाऱ्यासमवेत चर्चा,ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, ग्रामस्थ यांचेसमवेत मुक्त संवाद आणि दिवार लेखण,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मार्गदर्शन करण्यात आले ,महिला बचत गट व महिला ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, आशावर्कर याच्याशी संवाद साधण्यात आला ,भाजपा जेष्ठ कार्यकर्त्यांची बैठक व कारसेवक सन्मानचिन्ह वाटप,माध्यमिक विद्यालय सणसवाडी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व संस्था संचालक व शिक्षक यांच्याशी संवाद, ग्राम संघाचा हळदी कुंकू समारंभ व मार्गदर्शन तसेच युवकांसमवेत मुक्त संवाद आणि गाव चलो अभियानाचा समारोप करण्यात आला. 

यावेळी माजी संचालक कैलास सोनवणे, कामगार आघाडीचे बाबासाहेब दरेकर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष  जयेश शिंदे, ग्राम पंचायत सदस्य मोहन हरगुडे, माजी सरपंच राहुल गव्हाणे, शालेय समितीचे अमोल हरगुडे, अशोक हरगुडे, माजी उपसरपंच बारकु गव्हाणे, विद्याधर दरेकर,महेंद्र दरेकर, अतुल साठे,संतोष दरेकर, बाळासाहेब दरेकर, मुख्याध्यापक संतोष गोसावी , शिक्षकवृंद व विविध पदाधिकारी,ग्रामस्थ, महिला भगिनी व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!