Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्याआमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा रस्ता रोको आंदोलन...

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल – आबासाहेब सोनावणे

शिरूर भाजपाच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध

कोरेगाव भिमा – शिक्रापूर (ता.शिरूर) येथे शिरूर तालुका भाजपाच्या  कार्यकर्ते व नेत्यांनी जय श्री …. जय श्रीराम या जयघोषाने शिक्रापूर येथल चाकण चौक दुमदुमून सोडत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्री राम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत  त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात यावा अनुठा रस्ता रोको करण्यात येईल आवाहन भाजपा शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी केले.

शिरूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ  शिक्रापूर येथे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणा देत व छायाचित्र जाळून निषेध करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ मांढरे तर कार्यकर्त्यांचे आभार युवा मोर्चा अध्यक्ष रोहित खैरे यांनी मानले.

    यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव जयेश शिंदे, भाजपा ज्येष्ठ नेते बाळासाहेब चव्हाण, कामगार मोर्चा अशोक हरगुडे,  बजरंग दलाचे अध्यक्ष महेश चव्हाण, जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष सुरज चव्हाण,  तालुका सरचिटणीस केशव पाचर्णे, संतोष करपे, शिरूर हवेली विधानसभा विस्तारक रघुनंदन गवारे,भाजपा नेते पांडुरंग गायकवाड, भाजपा जिल्हा सचिव भाग्यश्री गायकवाड, ओबीसी महिला मोर्चा पल्लवी हिरवे, भाजपा चिटणीस सुनीताजाधव, युवा वॉरिअरस अध्यक्ष वैभव गवारे,विद्याधर दरेकर,पदवीधर आघाडी अध्यक्ष कमलेश कुलकर्णी , दिव्यांग आघाडी  अध्यक्ष गोरक्ष कुंभार यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!