मिलिंदा पवार वडूज सातारा
सातारा – बेकायदेशीर कृत्याबद्दल आमदार जयकुमार गोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे मात्र अद्याप त्यांना पोलिसांनी अटक केलेले नाही आमदार गोरे यांना अटक करावी अन्यथा सोमवार दिनांक २५ एप्रिल समविचारी संघटना बरोबर घेऊन वडूज तहसील कचेरीवर हल्लाबोल आंदोलनाचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला याबाबतचे लेखी निवेदन जनता क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्यांनी खटाव तहसीलदारांना दिले आहे या निवेदनामध्ये माईनेतील महादेव भिसे यांचे वडील पिराजी विष्णू भिसे हे वृद्धापकाळाने मयत झालेत.तरीही त्यांच्या जागी कोणीतरी अज्ञात इसम उभा करून त्यांचे बनावट आधार कार्ड तयार करून मयत व्यक्तीच्या नावे संगनमताने बोगस कागदपत्रे बनविणे मूळ कागदपत्र छेडछाड करणे बोगस आधार कार्ड प्रतिज्ञापत्र तयार करून आमदार व कार्यकर्त्यांनी १०० रुपयांचे बोगस प्रतिज्ञापत्र तयार केले यांच्यामुळे आधार कार्डचे छेडछाड करून बनावट आधार कार्ड तयार केले.
आमदार गोरे यांनी सहकाऱ्यांशी संगणमत करून मयत भिसे च्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीला उभे करून भिसे कुटुंबीयांची फसवणूक केली आहे कुटुंबीयांच्या राहत्या घरावर त्यांनी टाच आणली असून राहते घर पाडण्याचा मोठा डाव आखला आहे ही बाब गंभीर लाजिरवाणी आणि मानवतेला काळीमा फासणारी आहे. गोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे मात्र अद्याप गोरे यांना पोलिसांनी अटक केली नाही तात्काळ अटक झाले नाहीतर सोमवारी तहसील कचेरीवर हल्लाबोल आंदोलनाचा इशारा जनता क्रांती दल व समविचारी संघटनांना बरोबर घेवून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.