अनेक दिवसांच्या प्रलंबित प्रश्न लावला मार्गी,शेतकऱ्याचे वाचले दोन लाख रुपये
कोरेगाव भीमा – डोंगरगाव ( ता.हवेली) येथील तुषार गायकवाड यांना आमदार अशोक पवार व शासकीय जिल्हास्तरीय विद्युत वितरण महामंडळ नियंत्रण समिती सदस्य प्रदीप वसंतराव कंद यांच्या धडाकेबाज कामगिरीचा अनुभव आला असून शेतकरी कुटुंबाने आमदार अशोक पवार व प्रदीप कंद यांचे आभार मानले असून पदाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या गरजू घटकांपर्यंत सुविधा पोचविण्याचे स्तुत्य व पथदर्शक काम आहे .
डोंगरगाव येथील तुषार गायकवाड यांनी शेतामध्ये तिन वर्षांपूर्वी घर बांधले असून तेथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. वीज कनेक्शनसाठी एम एस सी बी कडे अर्ज केला होता पण त्याबाबत काही कार्यवाही होताना दिसत नव्हती. वीज खांब ते घरापर्यंत अंतर बरेच लांब असल्याने याबाबत दिरंगाई होताना दिसत होती. शेवटी गायकवाड यांनी स्वखर्चाने लाईट पोल, तारा टाकून वीज कनेक्शन घेण्याचा विचार केला तेंव्हा अडीच लाख रुपये खर्च असल्याचे लक्षात येताच कोरोना प्रादुर्भाव, शेतीची दुरावस्था यामुळे खालावलेली आर्थिक परिस्थितीमुळे हे शक्य नव्हते. याबाबत तेथील माजी उपसरपंच संभाजी ठोंबरे यांच्या माध्यमातून आमदार अशोक पवार यांचे पत्र एम एस सी बी ला देण्यात आले होते.
प्रदीप कंद यांच्या कार्याची प्रचिती –
शासकीय जिल्हास्तरीय विद्युत वितरण महामंडळ नियंत्रण समिती सदस्य प्रदीप वसंतराव कंद वीज महामंडळाकडे नागरिकांच्या अर्जाचा व तक्रारींचा आढावा घेत असताना त्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी गायकवाड यांच्याशी संपर्क साधला व वस्तुस्थिती जाणून घेत मदतीचे आश्वासन दिले याबाबत प्रदीप कंद यांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत अवघ्या पाच दिवसात शेतकऱ्याच्या शेतात विजेचे खांब बसवून , तारा जोडण्यात येऊन वीज उपलब्ध करून देण्यात आल्याने आमदार अशोक पवार ,प्रदीप वसंत कंद व एम एस सी बी कर्मचाऱ्यांच्या धडाकेबाज कामाचा अनुभव आल्याने शेतकरी गायकवाड व त्यांचे कुटुंब भारावले आहे.शेतकऱ्याच्या घरापर्यंत वीज पोचल्याची खात्री करण्यासाठी प्रदीप वसंतराव कंद यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता शेतकरी कुटुंबाने त्यांच्यावर अक्षरशः अभिनंदनचा व कौतुकाचा वर्षाव केला.प्रदीप कंदाच्या कामामुळे शेतकरी कुटुंब भारावले गेले. यावेळी प्रदीप कंद यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माझी उपसरपंच संभाजी ठोंबरे, शेतकरी तुषार गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.
तीन वर्षांपासून आम्ही रानात राहायला आहोत,एकटेच घर असल्याने वीज कनेक्शन इतक्या लांब खूप कठीण होते ,गावासाठी कोटींचा निधी येऊ शकतो ,त्यात एका घरासाठी काही मिळणे खूप अवघड असते याचा परिचय आम्हाला आला पण पण एका शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी वीज कनेक्शन घरापर्यंत फकत आमदार अशोक पवार व प्रदीप कंद हेच आणू शकतात त्यांचे मानावे तेव्हढे अभार कमी आहेत. – शेतकरी तुषार गायकवाड,डोंगरगाव
पदाच्या मधायमातून शेतकरी कुटुंबाच्या आयुष्यात चार सुखाचे क्षण आणण्यासाठी व त्यांच्या आयुष्यातील समस्या कमी करण्यासाठी काम केल्याचा मनापासून आनंद आहे याबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडवणार असून बळीराजा सुखी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. – प्रदीप वसंतराव कंद, सदस्य, जिल्हास्तरीय शासकीय विद्युत वितरण महामंडळ नियंत्रण समिती