Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रआमदार अशोक पवार लय भारी त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम करनाऱ्या सणसवाडी गावाची गोष्टच...

आमदार अशोक पवार लय भारी त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम करनाऱ्या सणसवाडी गावाची गोष्टच न्यारी

निष्ठावान , निस्वार्थ प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाचं गाव


तालुक्यासह जिल्हा पातळीवर महत्त्वाची पदे भूषविनाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच विश्वसनीय गाव

कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर)

उद्योगनगरी सणसवाडी गाव हे आमदार अशोक पवार यांच्यावर मनापासून प्रेम करणारे गाव अशी तालुक्यात ओळख असून स्वतः आमदार अशोक पवार यांनीही सणसवाडी करांच्या प्रेमाचे कौतुक वेळोवेळी केले आहे.

सणसवाडी ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी दत्तात्रय हरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी जाहीर कार्यक्रमात आमदार अशोक पवार यांनी जाहीर सत्कार सभेत बोलताना सणसवाडी करांचे आमच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. या गावाने मी आमदार नसताना माझे व कुटुंबाचे सुख दुःख वाटून घेतले आणि आमच्या कुटुंबावर मनसोक्त प्रेम केले. त्यावेळी सणसवाडीकर आमच्या सोबत राहिले, आजही त्यांच्या छोट्या मोठ्या आनंदाच्या प्रसंगात सहभागी करून घेतात यामुळे या गावाशी आमचे भावनिक नाते आहे.

पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर हे आमदार अशोक पवार यांच्यावर निरपेक्ष प्रेम करणारे ,त्यांच्यासाठी आमदार अशोक पवार म्हणजे जीव की प्राण , रामभक्त हनुमानाप्रमाणे पंडित दरेकर यांची एक वेगळी आहे .निष्ठावान व एकनिष्ठ कार्यकर्ता व विश्वासाचं नात जपणारा जिवलग मित्र असून आमदारांच्या प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगातील हक्काचा सवंगडी म्हणजे पंडित दरेकर असे समीकरण झाले आहे. एखाद्या कार्यक्रमात या पक्षनिष्ठ जिवलगांचा फोन वाजला की कॉलर ट्यून वाजली की… आवाज कोणाचा .. दाही दिशांत घूमला..राष्ट्रवादी पुन्हा …तसेच आमदार अशोक पवार यांची रिंगटोन वाजली की सर्वजण ओळखतात की पंडित दरेकर आले.

उद्योगनगरी सणसवाडी गाव हे आर्थिक दृष्ट्या सुबत्ता असलेले , औद्योगिक विकासामुळे मोठ्या प्रमाणात गावच्या विकासाचा आलेख उंचावत राहिला. गावच्या विकासाला व नागरिकांच्या सुख सुविधांना प्राधान्य दिले जाते. पक्ष, गट, तट विसरून एका विचाराने एकत्र येणारे गाव व इथे नाती गोती , पै – पाहुणे, मैत्रीपूर्ण.संबंध यामुळे येथील गावाची एकी व माणुसकी कायम चर्चेत राहणारी व उस्तुकता असणारी आसते. आमदार अशोक पवार यांनी सणसवाडी गावाने आमदारांना आणि आमदार पवार यांनी गावाला भरपूर प्रेम दिले आहे. गावाला उपसभापती ,सभापती व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पद ,संचालक जिजामाता बँक संचालक मार्केट कमिटी याबरोबर गावच्या नावलौकिक भर घालणारे सरपंच परिषद मुंबई पुणे जिल्हा महिलाध्यक्ष पद मिळाले राज्यातील आदर्श ग्राम पंचायत पुरस्कार हे आमदारांच्या विकासाच्या दृष्टीकोनाने केलेले गुणवत्ता पूर्ण कामे व गावाची एकी यामुळे साध्य झाले.

तालुक्यातील मोठ्या पुढाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मोठा गट असणारे गाव म्हणजे सणसवाडी ही ओळख असून येथील पुढारी हे नातेसंबंध व माणुसकी राखत एकमेकांच्या विचारांच्या व पक्ष निष्ठेचा आदर करतात. या गावात राष्ट्रवादीला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आणि त्यासाठी येथील कार्यकर्ते पक्ष व इतर गोष्टींचा विचार न करता आमदार अशोक पवार यांच्यावर प्रेम करतात यामुळे पक्षनिष्ठ व पक्षा बाहेरील ,सामान्य कार्यकर्त्यांसह आमदार पवार यांच्याशी सलोखा व जिव्हाळा असणारे गाव असून येथील पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर हे आमदार पवार यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांना एकनिष्ठ आमदार समर्थक असून त्यांनी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कार्यकर्ते व आमदार समर्थक यांची मोठी ताकद निर्माण केली आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा व सुख समृद्धि यासाठी सतत काम करणारे आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार हे राजकारणा पलीकडील सेवाभावी नेतृत्व आहे. गतीशिल विचारांचे कृतिशील नेतृत्व असणारे आमदार अशोक पवार यांच्या योजना राज्यसरकारने राबवल्या आहेत.त्याचे रुग्ण, कोरोना,पूरग्रस्त यासाठी महत्वपूर्ण काम असून शासकीय कामांना तातडीने पूर्ण करणारे समर्थ नेतृत्व आहे. – पंडित दरेकर,सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!