Wednesday, April 24, 2024
Homeताज्या बातम्याआमदार अशोक पवार यांनी सोडवला वाजेवाडी गावाचा विजेचा प्रश्न 

आमदार अशोक पवार यांनी सोडवला वाजेवाडी गावाचा विजेचा प्रश्न 

मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित प्रश्न सोडवत नवीन डी पि उपलब्ध करून देत जुन्या डी पि ची केली दुरुस्ती

वाजेवाडी (ता.शिरूर) गावठाण मधील डी पि वर भार वाढल्याने  मागील सहा महिन्यांपासून विजेचा प्रश्न प्रलंबित होता.डी पि वर लोड येऊन सारखी सारखी लाईट जात असल्याने नागरिक व शेतकरी त्रस्त झाले होते. मागील तीन महिन्यांत पाच ते सहा वेळा डी पि वर लोड येऊन जळाली होती.याबाबत सरपंच पूनम चौधरी,माजी सरपंच धर्मराज वाजे, नितीन वाजे यांनी आमदार अशोक पवार यांना याबाबत आपली समस्या सांगितली यावर आमदार अशोक पवार यांनी संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत तातडीने १०० के व्ही ए ची डी पि उपलब्ध करून दिल्याने वाजेवाडी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत आमदार अशोक पवार यांचे आभार मानले.

     याबाबत एम एस सी बीचे शिक्रापूर कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, सहाय्यक अभियंता भगवान विधाते, वायरमन शहाजी दौंडकर यांनी विशेष सहकार्य करत तातडीने नवीन १०० के व्ही क्षमतेची नवीन डी पि उपलब्ध करून देत बसवले तसेच पूर्वीचे दुरुस्त केले व दोन्ही ट्रान्सफॉर्मर व्यवस्थित चालू करत नागरिकांची विजेची समस्या सोडवल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी सरपंच पूनम चौधरी, उपसरपंच रामदास मांजरे, माजी सरपंच धर्मराज वाजे, नितीन वाजे,श्वेता मांजरे, मंगल तिखे,सूरज तिखे, औदुंबर भोंडवे,चैत्राली वाजे,रवींद्र वाजे,नारायण वाजे,रमेश वाजे,विशाल वाजे,पिंटू पवार,मच्छिंद्र तिखे, ॲड अप्पासो वाजे,हरीश वाजे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!